मुंबई, 14 मे : कर्नाटकमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपला पराभवाची धूळ चारत राज्यात काँग्रेसनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. काँग्रेसच्या या विजयावर प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्ष कधी जिंकत नाही सत्ताधारी हरत असतात. पराभव हा स्वभावाचा पराभव आहे. आपलं कोणीच वाकड करू शकत नाही, असं मानणाऱ्यांचा हा पराभव आहे. लोकांना कधीही गृहीत धरू नये, या निकालांमधून सगळ्यांनी बोध घेण्यासारखा आहे. कर्नाटकातील हा विजय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हटलं राज ठाकरेंनी?
राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या कर्नाटक विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सोबतच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं देखील कौतुक केलं आहे. विरोधी पक्ष कधी जिंकत नाही सत्ताधारी हरत असतात. पराभव हा स्वभावाचा पराभव आहे. आपलं कोणीच वाकड करू शकत नाही असं मानणाऱ्यांचा हा पराभव आहे. लोकांना कधीही गृहीत धरू नये, या निकालांमधून सगळ्यांनी बोध घेण्यासारखा आहे. कर्नाटकातील हा विजय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
मुनगंटीवारांवर प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी घडवून आणण्यात आला होता असं मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. यावरून राज ठाकरे यांनी मुनगंटीवार यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. पहाटेचा शपथविधी ही तुमची चूक होती, ती चूक झाली आहे. उगाच कोणाला धडा शिकवायला जाऊ नका, आता सारवासारव करण्यात काही अर्थ नाही, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.