बँगलोर, 7 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार शिगेला पोहचला आहे. सत्ताधारी भाजपची स्थिती यावेळी चांगली दिसत नाही. भाजपने केंद्रीय मंत्र्यासह भाजपशासित राज्यातील मंत्रीही प्रचारात उतरवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात उतरले आहेत. मराठी मते मिळवण्यासाठी भाजपने शिंदे यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे शिंदेचा भाजपला कितीपत फायदा होणार हे पहावे लागेल. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषिक असलेल्या सीमावर्ती भागाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. यामागचं कारणही समोर आलं आहे.
कर्नाटकात भाजपने सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने चांगलीच रणनीती आखली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना प्रचारात उतरवले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आता बँगलोरमध्ये जाऊन प्रचार करत आहेत. कर्नाटकात मराठी भाषिक मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. तिथे शिंदेचा उपोयोग भाजपकडून केला जात आहे. शिंदे खरंतर सीमावर्ती भागात प्रचार करणार होते. मात्र, संजय राऊत यांनी मराठी एकीकरण समितीच्या विरोधात येणाऱ्यांना हिसका दाखवण्याचे आवाहन सीमावर्ती भागातल्या मतदारांना केलं आहे. यामुळेच शिंदेंनी आपला मोर्चा बँगलोरकडॆ वळवला असल्याचे बोलले जात आहे. आज सकाळी बँगलोरमध्ये दाखल झालेल्या शिंदेचे जोरदार स्वागत करण्यात आलं आहे.
वाचा – राजीनामास्त्रानंतर पवार पहिल्यांदाच विठ्ठलाच्या चरणी, पंढरपुरातून पुनश्च हरी ओम!
बँगलोर आणि परिसरात मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत. काँग्रेसने भाजप समोर मोठे आव्हान निर्माण केल्याने एक एक मत भाजपसाठी महत्वाचे आहे. त्यामुळे शिंदे प्रचारात उतरले आहेत. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सत्ता बदल झाला आहे, त्याच पद्धतीने कर्नाटकातही भाजपने सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे शिंदेचे आवाहन मराठी भाषिक किती पाळतात यावर मराठी मतदारांचे मत अवलंबून आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचा मराठी नेत्यांना विरोध
महाराष्ट्रातील राजकीय नेतेही आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी जोर लावून उतरले आहेत. मात्र, त्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. 4 मे ला बेळगावात प्रचारासाठी गेलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि सतेज पाटील यांना महाराष्ट्र एकीकरण समितीने काळे झेंडे दाखवून विरोध केला होता. तर 5 मे ला काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सभा उधळूण लावण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.