भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी
कल्याण, 13 मे : ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर म्हणून कल्याणची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जवळचा संबंध असलेल्या कल्याण शहरात आजही अनेक ऐतिहासिक वास्तू आढळतात. कल्याणमध्ये शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्याची बांधणी केली होती. कल्याणच्या खाडी किनारी उभा असलेला हा किल्ला शहराचा इतिहास सांगण्यासाठी भक्कम उभा आहे.
दुर्गाडी नाव का?
तुमच्या शहरातून (मुंबई)
सातवाहन काळापासून महत्तावाचं बंदर अशी कल्याणची ओळख आहे. आदिशहाकडं 1657 पर्यंत कल्याणचा ताबा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या शहराचं महत्त्व ओळखले होते. त्यामुळे त्यांनी आदिलशाहाचा पराभव करत कल्याणचा स्वराज्याचा समावेश केला. महाराजांनीच कल्याणच्या खाडीकिनारी किल्ला बांधण्याचं ठरवलं. या किल्ल्याचे बांधकाम करताना तिथं मोठी संपत्ती सापडली. दुर्गा देवीच्या आशिर्वादानाचं ही संपत्ती सापडली असं समजून महाराजांनी किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर बांधले. त्यामुळेच या किल्ल्याला दुर्गाडी हे नाव पडले.
कल्याण रेल्वे स्टेशनपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर आणि तटबंदी आहे. किल्ल्यावरील बरेच अवशेष काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत. पण, काही आजही शाबूत असून त्यामधून यापूर्वीच्या काळातील भव्यता लक्षात येते.
मुख्य गडावर जाण्यासाठी असलेलं प्रवेश्वद्वार नष्ट झालं असलं तरी बुरूज शाबूत आहे. प्रवेशद्वारासमोरच गणेशाची मूर्ती आहे. या प्रवेशद्वाराला गणेश दरवाजा असे नाव होते. किल्ल्यावरील दुर्गा देवीच्या मंदिरात नव्याने प्रतिस्थापना केलेली देवीची मूर्ती असून, पुरातन मूर्तीही मंदिरात ठेवण्यात आलेली आहे. मंदिराची बांधणी आज मजबूत स्थितीत आहे.
श्रीरामानं घेतलं होतं दर्शन, सप्तश्रृंगी मंदिराचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का? पाहा Video
नवरात्राच्या काळात या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. अन्य दिवशीही भावीक येथे दर्शनासाठी येत असतात. मंदिराच्या मागील बाजूस किल्ल्याचा इतिहास लिहला आहे. किल्ल्याच्या खाडीकडील भागाकडे तटबंदी व बुरूजाचे अवशेष आहेत. किल्ल्यावरील बरेचशे अवशेष काळाच्या ओघात लुप्त झालेले आहे.
संध्याकाळच्या वेळेत फिरण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. दुर्गाडी किल्ल्यावरून गणेश घाटाचे आणि कल्याणच्या खाडीचे नयनरम्य दृष्य दिसते. ते पाहताना फोटो काढण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही.
दुर्गाडी किल्ल्याला कसं जाल?
कल्याण रेल्वे स्टेशनहून रिक्षाने दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते. कल्याणहून भिवंडीकडे एसटी बस आणि महापालिकेच्या बस जातात. या बस दुर्गाडी किल्ल्याजवळूनच जात असल्याने तिथे उतरता येते. ठाण्याहून भिवंडी बायपासला उतरून तेथून कल्याणकडे येणाऱ्या रस्त्यावर दुर्गाडी किल्ला येतो
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.