मुंबई, 15 मे: सितारा – द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa – The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 15 मे 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
काही व्यक्तींच्या जीवनात प्रेमसंबंध बहरण्याची शक्यता आहे, असं ओरॅकल रीडिंग सांगतं.
दिवसासाठीचा सारांश : ओरॅकल रीडिंगमधून असं दिसून येत आहे, की सध्या तुम्हाला मेहनतीचं फळ नक्की मिळणार आहे. तुमचं ध्येय साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहात, आणि त्याचा परतावा आता तुम्हाला मिळणार आहे. सोबतच एखाद्या नव्या नात्याची सुरुवातदेखील होण्याची शक्यता आहे. हे नातं रोमँटिक किंवा प्लॅटोनिक असू शकतं, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद आणि सकारात्मकता येईल. या नात्याचा तुम्ही खुल्या मनाने स्वीकार करणं गरजेचं आहे. सध्या भूतकाळातल्या नकारात्मक गोष्टी आणि आठवणींना मागे सोडण्याची वेळ आली आहे. असं केल्यामुळे तुम्हाला भविष्याबाबत स्पष्टता मिळेल आणि पुढे जाण्यासाठी नवीन ध्येय प्राप्त होईल.
मेष (Aries) (21 मार्च ते 19 एप्रिल)
तुमच्या लव्ह लाइफमध्ये आनंद आणि सलोखा असेल. तुमचं नातं सकारात्मक दिशेने जात असल्याचे हे संकेत आहेत. आता तुम्हाला अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागेल, ज्यांमुळे तुम्हा दोघांनाही आनंद मिळेल. करिअर आणि फायनान्स या दोन्ही स्तरांवर चांगली वृद्धी होणारा हा काळ आहे. तुमच्यात यश मिळवण्याची क्षमता आहे; मात्र सध्या लो प्रोफाइल राहणं आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. समोर काही अडथळे येऊ शकतात; मात्र त्यांचा ताकदीने सामना करून पुढे जात राहणं आवश्यक आहे.
LUCKY Sign – A Peacock Feather
LUCKY Color – Indigo
LUCKY Number – 2
Vastu Tips In Marathi: चुकूनही घरात लावू नका ही 5 झाडे
वृषभ (Taurus) (20 एप्रिल ते 20 मे)
तुम्ही नवीन नातेसंबंध प्रस्थापित करत आहात किंवा आधीच्या नातेसंबंधांमध्ये मजबुती आणण्याचा प्रयत्न करत आहात. यामध्ये तुम्हाला यश मिळणार असं दिसतंय. ओरॅकल रीडिंगमधून तुमच्यासाठी वृद्धी, सुबत्ता आणि पोषक एनर्जी दिसून येत आहे. म्हणजेच, तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे. सोबतच तुम्हाला मोठं आर्थिक यशदेखील मिळणार असल्याचं रीडिंग दर्शवत आहे. खर्चावर ताबा ठेवण्याची गरज आहे. तसंच गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. तुम्हाला आयुष्यात समतोल साधण्याची गरज आहे. तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योग्य अशी दिनचर्या अवलंबण्याची आवश्यकता आहे. सध्या प्रवास करणं फायद्याचं ठरेल. प्रवास केल्यामुळे तुमचं नेटवर्क वाढवण्याची संधी मिळेल.
LUCKY Sign – A Rudraksh bead
LUCKY Color – Pink
LUCKY Number – 66
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
नात्यांमध्ये संवाद साधणं अगदी गरजेचं असतं हे लक्षात घ्या. तुम्हाला स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहून, खरं बोलणं गरजेचं आहे. ओरॅकल रीडिंगमध्ये असं दिसून येतंय, की तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं आणखी घट्ट होणार आहे. करिअर फ्रंटवर तुम्हाला नवीन संधी आणि आयडिया मिळतील. खर्चावर ताबा ठेवणं आणि विचारपूर्वक गुंतवणूक करणं गरजेचं आहे. एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला जाणं किंवा तुमच्याच जवळच्या भागात फिरणंदेखील चांगलं ठरेल. खाण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे. तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला योग्य ठरतील अशा गोष्टींचा आहारात समावेश करा. भरपूर ट्रॅफिक असणाऱ्या ठिकाणी जाणं टाळा.
LUCKY Sign – A solo performance
LUCKY Color – Brown
LUCKY Number – 26
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत एक नवीन प्रवास सुरू होईल असं दिसतंय. कदाचित एखाद्या नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते किंवा सुरू असलेल्या रिलेशनशिपमध्ये एखादा मोठा टप्पा ओलांडू शकाल. किंवा मग हा नातेसंबंधांबाबत आत्म-शोधाचा प्रवासही असू शकतो. याव्यतिरिक्त ओरॅकल रीडिंग हालचाल आणि प्रगतीदेखील दाखवत आहे. करिअरच्या बाबतीत विपुलता दिसून येत आहे. सध्या संयम बाळगणं आणि नैसर्गिक चक्रांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हे ओरॅकल रीडिंग पार्टनरशिप आणि गिफ्ट-गिव्हिंगदेखील दर्शवत आहे. म्हणजेच तुमच्या आजूबाजूचे तुम्हाला सपोर्ट करणारे संबंध तुमच्या फायद्याचे ठरू शकतात. प्रवास केल्यामुळे नवीन अनुभव आणि नवीन ओळखी होतील, ज्या भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतील.
LUCKY Sign – A new acquaintance
LUCKY Color – Silver
LUCKY Number – 17
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
यश, कर्तृत्व आणि समृद्ध संबंध अशा सर्व गोष्टी ओरॅकल दर्शवत आहे. आपल्या जोडीदाराशी प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे संवाद साधणं गरजेचं आहे. करिअरमध्ये अगदी अनपेक्षित अशा, मात्र चांगल्या संधी चालून येतील. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी संयमाने आणि चिकाटीने प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. प्रवास केल्यामुळे कामासंबंधी लीड्स मिळू शकतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. आरोग्याच्या चांगल्या सवयी जोपासण्यासाठी योग्य माध्यम किंवा जागा शोधण्याची गरज आहे. परिसरात होणाऱ्या छोट्या-मोठ्या चोरीच्या घटनांपासून सावध राहणं गरजेचं आहे.
LUCKY Sign – A table calendar
LUCKY Color – Blue
LUCKY Number – 25
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
ओरॅकल रीडिंग पार्टनरशिप आणि बॅलन्स याबाबत संकेत देत आहे. म्हणजेच, नातेसंबंधांच्या बाबतीत सध्या सामंजस्याचा काळ असणार आहे. दोन व्यक्तींमधला वाद सोडवण्यासाठी तुम्हाला मध्यस्थी करावी लागू शकेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. प्रवास केल्यामुळे आणि नवीन संधी एक्सप्लोअर केल्यामुळे फायदा होण्याचे संकेत आहेत. आयुष्यात समतोल शोधण्यासाठी तुम्हाला आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज भासू शकते. एखाद्या आध्यात्मिक मार्गदर्शकाची मदत घेणं फायद्याचं ठरेल.
LUCKY Sign – A lampshade
LUCKY Color – Peach
LUCKY Number – 4
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावा या रंगांचे पडदे
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
नवीन संबंध आणि प्रेम यांच्यासाठी तुम्ही तुमच्या हृदयाची दारं उघडाल, असे संकेत ओरॅकल देत आहे. क्षमा, करुणा आणि आत्म-प्रेमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओरॅकल तुम्हाला प्रोत्साहित करतं. हे गुण अवलंबण्यासाठी मदत करणाऱ्या एखाद्या आध्यात्मिक गोष्टीकडे तुम्ही आकर्षित व्हाल. तुमच्या नशीबात जे आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त कराल आणि विश्वास ठेवाल. आर्थिक स्थैर्य लाभेल, करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उपचार आणि मार्गदर्शन घ्याल. आध्यात्मिक मार्गदर्शक आणि शक्ती तुमच्या पाठीशी आहे. आयुष्यात सकारात्मक बदल करण्यासाठी प्रेरित व्हाल. कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून जोखीम घ्या. सभोवतालच्या जगाबाबत कुतूहल वाटेल.
LUCKY Sign – An abstract art
LUCKY Color – Lilac
LUCKY Number – 18
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
सध्या तुम्ही मजबूत आणि सपोर्टिव्ह मैत्री संबंध प्रस्थापित करण्यावर भर देत आहात. ओरॅकल रीडिंगमध्ये निष्ठा आणि विश्वासाचे संकेत आहेत. याचाच अर्थ, तुम्ही इतरांशी मजबूत आणि अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास सक्षम असाल. ज्ञान आणि मार्गदर्शनाचे संकेत आहेत, म्हणजेच तुम्ही करिअरवृद्धीसाठी नवीन मेंटॉरचा शोध घेत आहात. यश मिळवण्यासाठी तुम्ही इतरांकडून शिकण्याची तुमची तयारी असणं गरजेचं आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आपल्या विचार आणि भावनांवर आवर घालणं गरजेचं आहे. नवीन ठिकाणी प्रवास होण्याची किंवा नवीन अनुभव गाठीशी येण्याची शक्यता आहे.
LUCKY Sign – Floral design
LUCKY Color – Cyan
LUCKY Number – 8
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
तुमच्या जवळच्या व्यक्तीशी असलेले संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तुम्हाला तुमचं मन मोकळं ठेवण्याची गरज आहे. इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह कामाकडे आकर्षित व्हाल. नवीन संधी शोधण्यासाठी नवीन पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. तुमचं मन काय सांगत आहे हे ऐकण्याची गरज आहे. यामुळे तुमचा स्वतःवरचा विश्वास आणि आत्मजाणीव वृद्धिंगत होईल. नवीन अनुभवातून वृद्धी होण्याची शक्यता आहे. तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून अनोळखी गोष्टींना स्वीकारण्याचे संकेत ओरॅकल देत आहे. नवीन आणि रोमांचक ठिकाणी प्रवास करण्याची इच्छा होईल, यामुळे वैयक्तिक विकास आणि परिवर्तनाची संधी मिळेल.
LUCKY Sign – Teak wood table
LUCKY Color – Saffron Orange
LUCKY Number – 77
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
तुम्ही नवीन रोमँटिक नातेसंबंधांची सुरुवात करण्याची शक्यता आहे. तसंच, रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्ती आणखी मोठी कमिटमेंट करण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या बाबतीत मनमोकळेपणाने विश्वास ठेवण्याचा सल्ला तुम्हाला ओरॅकल देतं. तुमच्या आयुष्यात नक्कीच योग्य व्यक्ती येणार आहे. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमच्या क्षेत्रातल्या व्यक्तींचं मार्गदर्शन घेणं फायद्याचं ठरेल. सेल्फ-डाउट किंवा असुरक्षितता यांबाबत मनात विचार येत असतील, तर सेल्फ-लव्हचं तंत्र अवलंबा. स्वतःमधल्या विशेष कलागुणांना अधिक वाव द्या. यासाठी जवळच्या व्यक्तींची किंवा आध्यात्मिक मार्गदर्शकांची मदत घेतल्यास फायदा होईल. रोजच्या आयुष्यातून ब्रेक म्हणून प्रवास फायद्याचा ठरेल. इतर गोष्टींच्या तुलनेत आपल्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या. सेल्फ-केअरसाठी वेळ काढा.
LUCKY Sign – A large coffee mug
LUCKY Color – Cream
LUCKY Number – 22
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
तुमच्या जोडीदासोबत प्रचंड विश्वासाचा आणि सुरक्षिततेचा अनुभव तुम्ही घेत असाल. आपल्या नात्यावर आणि प्रेमाच्या शक्तीवर विश्वास ठेवा. ओरॅकल रीडिंग आत्मविश्वास आणि सेल्फ-अशुरन्स दर्शवत आहे. करिअरमध्ये यश अनुभवत आहात; मात्र कधीकधी स्वतःच्या क्षमतेवर संशय घ्याल. आत्मविश्वासाचा अभाव असू शकतो. तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करत आहात. स्वतःची काळजी घेणे आणि गरजांकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रवास केल्याने फायदा होईल. रोजच्या जीवनातून विश्रांती मिळेल. दैनंदिन आयुष्यातून छोटा ब्रेक घेऊन सेल्फ-केअरवर लक्ष देण्याची गरज आहे.
LUCKY Sign – Money plant
LUCKY Color – Brown
LUCKY Number – 45
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
सध्या प्रेमाचा काळ आहे. तुम्ही एखाद्या नवीन रिलेशनशिपचा विचार करत आहात किंवा सुरू असलेल्या नातेसंबंधांना आणखी मजबूत करण्याच्या विचारात आहात. या बाबतीत नशीबाची तुम्हाला जोरदार साथ मिळणार आहे. करिअरच्या बाबतीत काही अडचणी येण्याची शक्यता आहे; मात्र त्यांना सामोरं जाण्यासाठी योग्य ती मदत तुम्हाला मिळेल आणि नक्कीच यश प्राप्त कराल. समोर येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी आपली आंतरिक शक्ती दाखवाल. एखाद्या अवघड परिस्थितीतून जात आहात; मात्र त्याला सामोरं जाण्यासाठी पुरेशी ताकद आणि लवचिकता तुमच्यात आहे. एखाद्या अनोळख्या ठिकाणी एक्स्प्लोरेशन आणि साहसी योजना आखाल. प्रवास फायदेशीर ठरेल. त्यामुळे नवीन गोष्टी शिकण्याची आणि नवीन दृष्टिकोन प्राप्त करण्याची संधी मिळेल.
LUCKY Sign – A creeper
LUCKY Color – Dark Grey
LUCKY Number – 3
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.