मुंबई, 18 मे: सितारा – द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa – The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 मे 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
घरामध्ये शांतता आणि समाधानाचं वातावरण राहील, कामातून छोटीशी विश्रांती मिळेल – पाहा कोणत्या राशीचं आहे हे भविष्य.
दिवसासाठीचा सारांश : ओरॅकल रीडिंगमधून आजच्या दिवसासाठी भरपूर ऊर्जा आणि वृद्धीची संधी दिसून येत आहे. काही अनपेक्षित मात्र सकारात्मक बदल दिसून येतील. कामाच्या ठिकाणी क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन आणि वेगळा विचार करण्याची क्षमता या गुणांचं कौतुक होईल. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये सहानुभूती, करुणा आणि समजूतदारपणाची आवश्यकता आहे. आरोग्यासाठी रुटिन ठरवणं गरजेचं आहे. प्रवासाच्या माध्यमातून नवीन सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभव घेण्याची इच्छा होईल. नवीन संधींचं सोनं करून, वैयक्तिक वृद्धीवर लक्ष केंद्रित करण्याचा आजचा दिवस आहे.
मेष (Aries) (21 मार्च ते 19 एप्रिल)
आज एखाद्या व्यक्तीबद्दल तीव्र आकर्षण अनुभवाल. प्रामाणिक रहा, आणि आपल्या भावना व्यक्त करा. आज भरपूर आत्मविश्वास राहील, तसंच महत्त्वाकांक्षा उत्पन्न होईल. या ऊर्जेचा वापर तुमचं ध्येय गाठण्यासाठी करा. नवीन गोष्टी शिकण्यासाठीची तुमची उत्सुकता आणि उत्साह अधोरेखित होईल. जोडीदाराकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्याकडे तुमचं प्रेम व्यक्त करा आणि कौतुक करा. शारीरिक हालचाल करण्याची गरज वाढेल. फिटनेसकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुमचा स्वभाव साहसी आणि उत्साही आहे, त्यामुळे एखाद्या साहसी ठिकाणाला भेट देण्याची गरज आहे.
LUCKY Sign – A jute bag
LUCKY Color – Orange
LUCKY Number – 9
वृषभ (Taurus) (20 एप्रिल ते 20 मे)
स्थिरता आणि सुरक्षितता या गोष्टींची आज अधिक गरज जाणवेल. या ऊर्जेचा उपयोग जोडीदाराशी भावनिक नातं घट्ट करण्यासाठी करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या व्यावहारिक आणि पद्धतशीर स्वभावाचे कौतुक होईल. कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी या ऊर्जेचा वापर करा. बिझनेस आणि फायनान्स क्षेत्रातील तुमची आवड दिसून येईल. या विषयांचा अभ्यास करणं फायद्याचं राहील. तुमच्या जोडीदाराला आज अधिक भावनिक आधाराची गरज असेल. त्यांना तुमचं प्रेम आणि जिव्हाळा हवाय. सेल्फ केअर आणि रिलॅक्सेशनसाठी एखादी योजना आखाल. स्वतःसाठी काही वेळ काढा. निसर्गाच्या सान्निध्यात एखाद्या शांत ठिकाणी गेल्यास आवश्यक विश्रांती मिळेल, स्वतःला रिचार्ज करू शकाल.
LUCKY Sign – Turquoise
LUCKY Color – Pink
LUCKY Number – 18
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
तुमची आकर्षक पर्सनॅलिटी आणि बुद्धिमत्ता एखाद्या संभाव्य जोडीदाराला आकर्षित करेल. नवीन लोकांशी ओळखी होतील. कामाच्या ठिकाणी तुमचं संवाद कौशल्य आणि अनुकूलता याचं कौतुक होईल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी या ऊर्जेचा वापर करा. कम्युनिकेशन आणि मीडिया क्षेत्रातील तुमचा रस आज दिसून येईल. तुमच्या जोडीदाराकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करा, त्यांचं कौतुक करा. बौद्धिक आव्हानं स्वीकारण्याची गरज वाटेल. मनाला उत्तेजन देणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. सांस्कृतिक विविधता आणि चैतन्यपूर्ण वातावरण असणाऱ्या एखाद्या ठिकाणी सहल आयोजित करू शकता.
LUCKY Sign – A Chess board
LUCKY Color – Yellow
LUCKY Number – 15
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
रिलेशनशिपमध्ये तुमची भावनिक खोली आणि संवेदनशीलता दिसून येईल. यामुळे तुमच्या जोडीदारासोबतचं नातं अधिक घट्ट होण्यास मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा मदत करण्याचा आणि पोषक स्वभाव सर्वांना आवडतो आहे. याचा वापर करून तुम्ही सहकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकाल. आज मानसशास्त्र आणि भावनिक बुद्धिमत्ता या गोष्टींमध्ये अधिक रूची दिसेल. शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी हे विषय फायद्याचे ठरू शकतात. तुमच्या जोडीदाराला अधिक भावनिक आधाराची आणि समजून घेण्याची गरज आहे. त्यांना तुमचं प्रेम आणि करुणा हवी आहे. तुम्हाला सेल्फ केअर आणि इमोशनल हीलिंगची गरज आहे. आंतरिक शांतीला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टींमध्ये सहभागी व्हा. दैनंदिन जीवनातून आवश्यक असणारा ब्रेक मिळवण्यासाठी एखाद्या शांत आणि निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्या.
LUCKY Sign – A Feather
LUCKY Color – Brown
LUCKY Number – 42
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुमची आकर्षक पर्सनॅलिटी आणि आत्मविश्वास पाहून एखादा संभाव्य जोडीदार तुमच्याकडे आकर्षित होईल. याचा फायदा तुम्हाला नवीन लोकांशी ओळखी निर्माण करण्यात होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्रिएटिव्हिटी आणि नेतृत्त्वगुणांचा दाखला देऊन इतरांना प्रेरित केलं जाईल. कला आणि क्रिएटिव्ह एक्स्प्रेशन क्षेत्रातील तुमची आवड अधोरेखित होईल. तुमच्या जोडीदाराकडे अधिक लक्ष देण्याची आणि कौतुकाची गरज आहे. त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करा आणि कृतज्ञ रहा. डान्स किंवा योगासनांत सहभागी व्हा. तुम्हाला लक्झरिअस राहणं आवडतं, त्यामुळे अशाच एखाद्या ग्लॅमरस ठिकाणाला भेट दिल्यास फायदा होईल.
LUCKY Sign – Red Car
LUCKY Color – Indigo
LUCKY Number – 3
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
तुमचा व्यावहारिक आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याचा स्वभाव नात्यामध्ये अधोरेखित होईल. आपल्या जोडीदाराशी योग्य संवाद साधण्यासाठी या ऊर्जेचा वापर करा. कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता आणि विश्लेषणात्मक कौशल्यांचा फायदा होईल. यामुळे तुम्ही उत्पादकता वाढवू शकता. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तुमची आवड तुम्हाला विषयांचे तर्कशुद्ध संशोधन करण्यास भाग पाडेल. तुमच्या जोडीदाराला अधिक व्यावहारिक आधार आणि प्रॉब्लेम-सॉल्विंग स्किल्सची आवश्यकता असू शकते. त्यांना तुमचे प्रेम आणि समजूतदारपणा दाखवा. ऑर्गनायझेशन आणि संरचनेची तुमची गरज दिसून येईल. या ऊर्जेचा वापर करून तुमच्या आजूबाजूच्या वातावरणातील गुंतागुंत कमी करा. तुमची जिज्ञासा आणि नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी एखाद्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या ठिकाणाला भेट द्या.
LUCKY Sign – A Topaz
LUCKY Color – White
LUCKY Number – 22
Vastu Tips In Marathi: चुकूनही घरात लावू नका ही 5 झाडे
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
तुमचा चार्म आणि डिप्लोमसी पाहून संभाव्य जोडीदार तुमच्याकडे आकर्षित होतील. या ऊर्जेचा वापर करून नवीन लोकांसोबत सकारात्मक नातेसंबंध प्रस्थापित करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्यातील समतोल आणि सामंजस्याची भावना याचे कौतुक होईल. ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी याचा वापर करा. कला आणि सौंदर्यातील तुमची आवड तुम्हाला नवीन संधी मिळवून देऊ शकते. तुमच्या जोडीदाराला अधिक लक्ष आणि भावनिक आधाराची गरज असू शकते. त्यांना तुमचे प्रेम आणि आपुलकी दाखवा. ध्यान किंवा योग अशा भावनिक आणि अध्यात्मिक गोष्टींमध्ये व्यग्र रहा. दैनंदिन जीवनातून विश्रांती म्हणून एखाद्या निसर्गरम्य आणि शांत ठिकाणाला भेट द्या. आयुष्यात संतुलन शोधण्याचा हा एक मार्ग ठरू शकतो.
LUCKY Sign – Ruby
LUCKY Color – Crimson
LUCKY Number – 30
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
तुमच्या नात्यामध्ये तीव्र उत्कटता आणि भावनिक खोली दिसून येईल. यामुळे जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा फोकस आणि जिद्द यांचे कौतुक होईल. नवीन प्रोजेक्ट आणि आव्हानं स्वीकारण्यासाठी या ऊर्जेचा वापर करा. मानसशास्त्र आणि भावनिक बुद्धिमत्ता या विषयांतील तुमचा रस दिसून येईल. तुमच्या जोडीदाराला अधिक भावनिक आधार आणि समजून घेण्याची गरज आहे. त्यांना तुमचं प्रेम आणि करुणा हवी आहे. तुम्हाला इमोशनल हीलिंगची आणि परिवर्तनाची गरज आहे. तुम्हाला गूढ गोष्टींचं आकर्षण आहे. त्यामुळे, अशाच एखाद्या ठिकाणी सहल आयोजित करणं फायद्याचे ठरेल.
LUCKY Sign – Green Bag
LUCKY Color – Parrot Green
LUCKY Number – 11
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
तुमचा साहसी आणि उत्स्फूर्त स्वभाव संभाव्य जोडीदारांना आकर्षित करेल. नवीन लोकांशी कनेक्ट होण्यासाठी या ऊर्जेचा वापर करा. कामाच्या ठिकाणी तुमचा आशावाद आणि उत्साह इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. प्रवास आणि एक्सप्लोरेशन या गोष्टींमधील तुमची आवड अधोरेखित होईल. नवीन संस्कृती आणि भाषा शिकण्याची संधी मिळेल. तुमच्या जोडीदाराला अधिक उत्साह आणि उत्स्फूर्ततेची गरज आहे. त्यांच्याकडे प्रेम व्यक्त करा. रॉक क्लाइंम्बिंग किंवा हायकिंग अशा साहसी गोष्टी करण्याची इच्छा होईल. साहसी आणि आऊटडोअर अॅक्टिव्हिटी असणाऱ्या एखाद्या ठिकाणी सहल आयोजित करणं फायद्याचे ठरेल.
LUCKY Sign – Silverware
LUCKY Color – Violet
LUCKY Number – 55
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
नात्यामध्ये तुमची जबाबदारी आणि बांधिलकीची भावना अधोरेखित होईल. आपल्या जोडीदारासोबत नातं घट्ट करुन, दोघांच्या समान ध्येयांवर लक्ष देण्याची गरज भासेल. कामाच्या ठिकाणी तुमचा व्यावहारिकपणा आणि जिद्द याचे कौतुक होईल. यामुळे तुम्ही लाँग टर्म प्रोजेक्टवर लक्ष देऊ शकाल. बिझनेस आणि फायनान्स क्षेत्रातील तुमचा रस दिसून येईल. तुमच्या जोडीदाराला अधिक स्थैर्य आणि सुरक्षिततेची गरज आहे. त्यांना तुमचे प्रेम आणि कमिटमेंट दाखवा. टाईम मॅनेजमेंट किंवा मील प्लॅनिंग अशा शिस्तीला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टींवर भर द्या. इतिहासात तुमची आवड वाढवण्यासाठी एखाद्या ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणाला भेट द्या.
LUCKY Sign – Laughing Buddha
LUCKY Color – Neon Orange
LUCKY Number – 21
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
तुमची स्वातंत्र्याची भावना आणि वेगळेपण यामुळे संभाव्य जोडीदार आकर्षित होऊ शकतील. तुम्ही समविचारी व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकता. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला महत्त्व मिळेल. या ऊर्जेचा उपयोग नवीन कल्पना आणि उपाय शोधण्यासाठी करा. तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्णतेतील तुमची आवड दिसून येईल. शैक्षणिक उपक्रमांमध्ये या विषयांचा शोध घ्याल. तुमच्या जोडीदाराला अधिक स्पेस आणि स्वातंत्र्याची गरज आहे. त्यांना तुमचं प्रेम व्यक्त करा, आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करा. सेल्फ-एक्स्प्रेशन आणि क्रिएटिव्हिटी दाखवता येईल अशा गोष्टींमध्ये सहभागी व्हा. यामध्ये कला किंवा संगीताचा पर्याय असू शकतो. एखाद्या अनोख्या आणि अपारंपरिक अशा ठिकाणाला भेट दिल्यामुळे फायदा होईल.
LUCKY Sign – Parachute
LUCKY Color – Peach
LUCKY Number – 60
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावा या रंगांचे पडदे, कुटुंबात कायम राहील सुख-शांती
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
तुमची भावनिकता आणि इंट्युशन आज नात्यामध्ये हिताची ठरेल. यामुळे जोडीदाराशी भावनिक नातं घट्ट होण्यास मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची सहानुभूती आणि करूणा सहकाऱ्यांशी सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्यास मदत करेल. अध्यात्म आणि मेटाफिजिक्स या विषयांतील रूची वाढेल. तुमच्या जोडीदाराला अधिक भावनिक आधार आणि समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यांना तुमचे प्रेम आणि करूणा दाखवा. तुम्हाला इमोशनल हीलिंग आणि सेल्फ केअरची आवश्यकता आहे. मेडिटेशन किंवा अरोमा थेरपी फायद्याची ठरेल. एखाद्या अध्यात्मिक आणि शांत ठिकाणाला भेट दिल्यास आत्मशोध आणि आत्मपरिक्षण करण्याची संधी मिळेल.
LUCKY Sign – A Canvas
LUCKY Color – Powder Blue
LUCKY Number – 4
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.