मुंबई, 21 मे: सितारा – द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa – The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 21 मे 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
दिवसाचा सारांश: आजचं ‘ओरॅकल स्पीक्स’ सर्व 12 राशींच्या जीवनातील विविध पैलूंची झलक देतंय. मेष राशीच्या व्यक्तींनी नातेसंबंधांमध्ये भावनिक नातं मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करून नवीन प्रेमळ सुरुवातीला स्वीकारावं. वृषभ राशीची व्यक्ती नोकरी, नवीन व्यवसाय या दोन्हींमध्ये व्यावहारिकता आणि सूक्ष्म नियोजनाद्वारे यश मिळवू शकते. मिथुन राशीच्या व्यक्तीला मोकळेपणानं संवाद साधण्याचा, बदलांशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला जातोय. कर्क राशीच्या व्यक्तीनं त्यांच्या नातेसंबंधांत भावनिक नातं जोपासत स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य द्यावं. सिंह राशीच्या व्यक्ती आत्मविश्वास, नेतृत्वाच्या आधारे प्रेमात आणि व्यवसायात यशाची अपेक्षा करू शकतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी नातेसंबंधांतील असुरक्षितता, परिवर्तन स्वीकारणं गरजेचं आहे. धनू राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात समृद्धी येईल. तर, कुंभ राशीच्या व्यक्तीला चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहन मिळेल. मीन राशीच्या व्यक्ती नातेसंबंधात आणि वैयक्तिक प्रयत्नांमध्ये करुणा व कलात्मक अभिव्यक्तीवर जोर देतील.
मेष (Aries) (21 मार्च ते 19 एप्रिल)
समजूतदारपणा, संवाद याद्वारे तुमच्या जोडीदाराशी भावनिक संबंध मजबूत होतील. प्रेमाच्या नवीन सुरुवातीसाठी हा अनुकूल काळ आहे. मन मोकळे ठेऊन शक्यतांचा स्वीकार करून वाटचाल करा. चिकाटी आणि नाविन्यपूर्ण विचारानं कामाशी संबंधित आव्हानांवर मात करता येईल. तुमच्या प्रवृत्तीवर विश्वास ठेवा, मुत्सद्दी व्हा आणि अनावश्यक संघर्ष टाळा. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करून व्यावसायिक दृष्टीकोन ठेवा. जोखीम घेऊन यशासाठी तुमच्या अंतर्ज्ञानाचं अनुसरण करा. स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य द्या. काम आणि विश्रांती यात संतुलन राखणं फायद्याचं ठरेल. कौटुंबिक नातेसंबंध जपण्यासाठी त्यांच्यासोबत एकत्र वेळ घालवत संवाद साधा.
LUCKY Sign – Pink lilies
LUCKY Color – Peach
LUCKY Number – 5
वृषभ (Taurus) (20 एप्रिल ते 20 मे)
तुमच्या नातेसंबंधात विश्वास, स्थिरता निर्माण करण्यासाठी मेहनत करण्यासोबतच नात्याला पुरेसा वेळ द्या. वचन पाळा व धीर धरा. तुमच्या जोडीदारासोबत तुमचं भावनिक नातं अधिक घट्ट होऊ शकतं. स्थिर प्रगती आणि व्यावहारिक उपायांवर लक्ष केंद्रित करा. कठोर परिश्रमामुळे दीर्घकालीन यश मिळेल. तटस्थ राहून अनावश्यक वादात पडणं टाळा. तुमच्या सातत्यपूर्ण कामगिरीचं फळ दिसून येईल. एखादं काम करण्यापूर्वी आलेल्या संधीचं काळजीपूर्वक मूल्यांकन करा. तुमच्या प्रवृत्तीवर विश्वास ठेऊन अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. संतुलित दिनचर्या राखा व शारीरिक आरोग्याला प्राधान्य द्या. हळूवारपणे होणारी स्थिर प्रगती सकारात्मक परिणाम देईल. तुमच्या प्रियजनांसाठी पोषक आणि सुसंवादी वातावरण तयार करा. तुम्ही देत असलेल्या पाठिंब्याची खूप प्रशंसा होईल.
LUCKY Sign – Perfumed Candles
LUCKY Color – Blue
LUCKY Number – 22
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
लव्ह लाइफमध्ये संवादाला प्राधान्य देऊन तुमच्या जोडीदाराच्या गरजा लक्षपूर्वक ऐका. अनुकूलता महत्त्वाची आहे. तुमच्या जोडीदारासोबत नवीन अनुभव एक्सप्लोर करा, व बौद्धिक उत्तेजनेद्वारे स्पार्क जिवंत ठेवा. बदल आणि नवीन कल्पना स्वीकारा. तुमची अष्टपैलू प्रतिभा आणि अनुकूलता रोमांचक संधी निर्माण करतील. मुत्सद्दी राहून एखाद्याची बाजू घेणं टाळा. व्यावसायिकता टिकवून ठेवा, स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या नावीन्यपूर्ण कल्पना यशस्वी होण्याची शक्यता आहे. सावधपणे योजना करा आणि इतरांना मदत करण्यास प्राधान्य द्या. मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये संतुलन राहील. स्वत:ची काळजी घेताना तणाव व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबातील सदस्यांसोबत अर्थपूर्ण संवाद साधा. तुमची बुद्धी, हजरजबाबीपणा चर्चा आनंदी होण्यास उपयुक्त ठरेल.
LUCKY Sign – Ceramic diffuser
LUCKY Color – Beige
LUCKY Number – 14
काळ्या मिरीच्या या उपायाने शनिदेवाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती, नशीब होईल बलवान
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
लव्ह लाइफमध्ये तुमचं भावनिक नातं जोपासणं आवश्यक आहे. तुमच्या भावना व्यक्त करण्यासोबतच तुमच्या जोडीदाराला पाठिंबा द्या. भावनिक जवळीक वाढीस लागेल. आरामदायी क्षणांचा आनंद घ्या, त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी तुमचं नातं अधिक घट्ट होईल. तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेऊन मनाच्या इच्छेनुसार काम करा. तुमच्या आवडींशी जुळणार्या संधींचा स्वीकार करा. मुत्सद्दी दृष्टिकोन ठेऊन संघर्षांपासून दूर राहा. टीमवर्क आणि सहकार्यावर भर द्या. तुमची संवेदनशीलता व अंतर्ज्ञान तुम्हाला यशासाठी मार्गदर्शन करेल. तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेऊन जोखीम घ्या. स्वत:ची काळजी व भावनिक कल्याणाला प्राधान्य द्या. निसर्गाचा आनंद घेतल्यास शांतता मिळेल. त्यामुळे तुम्हाला आनंद देणार्या ॲक्टिव्हिटीमध्ये व्यस्त रहा. प्रेम आणि करुणेद्वारे तुमचे कौटुंबिक नातं मजबूत करा. तुमचा स्वभाव सुसंवादी वातावरण निर्माण करेल.
LUCKY Sign – Parrot
LUCKY Color – Grey
LUCKY Number – 24
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
लव्ह लाइफमध्ये उदार होऊन तुमचं प्रेम उघडपणे व्यक्त करा. तुमच्या जोडीदाराचं वेगळेपण स्वीकारा, व त्याच्या गुणांची प्रशंसा करा. प्रेम आणि उत्कटता दिसत असल्यानं तुमच्या जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव करा. तुमचं नेतृत्व कौशल्य दाखवण्याची संधी असून आव्हानात्मक प्रकल्पांची जबाबदारी घ्या. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यशाकडे नेईल. नोकरीच्या ठिकाणी स्वतःच्या कामाबद्दल जागरूक रहा व एखाद्या परिस्थितीला ठामपणे सामोरं जाणं टाळा. मदत महत्त्वाची आहे. तुमचा प्रभाव आणि आवड संधींना आकर्षित करेल. जोखीम घ्या व स्वतःच्या प्रवृत्तीवर विश्वास ठेवा. शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य राखण्यावर भर द्या. तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या ॲक्टिव्हिटींचा स्वीकार करा. तुमच्या कुटुंबात तुम्ही आनंद आणि सकारात्मकतेचे केंद्र होण्याची संधी आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे यश साजरे करून एक कायमस्वरूपी आठवण तयार करण्यास अनुकूल वेळ आहे.
LUCKY Sign– Postal Stamp
LUCKY Color – Mauve
LUCKY Number – 12
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
लव्ह लाइफमध्ये संवाद व तपशीलाकडे लक्ष द्या. तुमची विश्लेषणात्मक कौशल्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराला चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतील. साधेपणा स्वीकारा आणि छोट्याछोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवा. सेवाभावातून काम करून तुमचं प्रेम व्यक्त करा. विकासाकडे लक्ष आणि काटेकोर नियोजन यामुळे व्यावसायिक यश मिळेल. संघटित व केंद्रित रहा, अनावश्यक संघर्ष टाळा. तुमचे कठोर परिश्रम, समर्पण याचे फळ मिळेल. नवीन संधींचा शोध घेण्यापूर्वी पूर्ण संशोधन करून योजना तयार करणं फायद्याचं ठरेल. कारण व्यावहारिकता ही यशाची गुरुकिल्ली आहे. स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य देऊन निरोगी दिनचर्या सांभाळा. तुमच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या प्रियजनांना व्यावहारिक आधार देण्यावर भर द्या. तुमची भक्ती कौटुंबिक नातं दृढ करेल.
LUCKY Sign – Red Coat
LUCKY Color – Crimson
LUCKY Number – 8
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
नात्यामध्ये सुसंवाद आणि संतुलन शोधण्यावर भर द्या. तुमच्या जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष द्या. वेळप्रसंगी तडजोड करण्याचा प्रयत्न करा. एक प्रेमळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून सौंदर्य, कला यामध्ये लिप्त व्हाल. उत्कटता आणि शांतता यांच्यात संतुलन शोधाल. टीमवर्क आणि सहकाऱ्यांसोबत काम करण्यास भर द्या. तुमची मुत्सद्देगिरी कामाच्या ठिकाणी संघर्ष सोडवण्यास मदत करेल. निष्पक्ष राहा, एखाद्याची बाजू घेणं टाळा. कारण तुमची निष्पक्षता व मुत्सद्दीपणा यामुळे तुम्हाला आदर मिळेल. सहकार्य आणि भागीदारीमुळे यश मिळेल. व्यवसायात संतुलन आणि निष्पक्षता शोधा. शारीरिक आणि भावनिक संतुलन ठेवा. तुमच्या कुटुंबात शांतता, एकोपा वाढावा यासाठी सुसंवाद ठेवणं फायद्याचं ठरेल. सुसंवादासाठी इतरांना प्रोत्साहन देण्यासोबतच विचारपूर्वक निर्णय घ्या.
LUCKY Sign – Desserts
LUCKY Color – Purple
LUCKY Number – 16
घराच्या मुख्य दारात ठेवा या गोष्टी, लक्ष्मी होते प्रसन्न, धनप्रवेशाचा मार्ग होतो सुकर
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
नातेसंबंधात भावनिकता व विश्वास ठेवा. जवळीक वाढू द्या. उत्कटता आणि तीव्रता तुमचं लव्ह लाइफ प्रज्ज्वलित करेल. परिवर्तनाला सामोरे जाऊन प्रेमाला तुमच्यापेक्षा वरचढ होऊ द्या. तुमचा दृढनिश्चय, तीव्रता व्यावसायिक वाढीस कारणीभूत ठरेल. स्वतःच्या प्रवृत्तीवर विश्वास ठेऊन संधीचा फायदा घ्या. संघर्ष टाळून स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुमचं समर्पण, मेहनत याची दखल घेतली जाईल. तुमची महत्त्वाकांक्षा, लवचिकता यशाला चालना देईल. परिवर्तन स्वीकारून जोखीम घ्या. स्वत:ची काळजी घेण्यासोबतच भावनिक उपचारांवर लक्ष केंद्रित करा. नकारात्मकता सोडून देऊन परिवर्तन स्वीकारा. भावनिक संबंधांद्वारे तुमचं कौटुंबिक नातं जोपासा.
LUCKY Sign – Clock
LUCKY Color – Cherry Red
LUCKY Number – 11
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
तुमच्या जोडीदारासोबत साहसी आणि नवीन अनुभव घेण्याची उत्तम संधी. बांधिलकी जपत स्वातंत्र्याचा स्वीकार कराल. उत्साह आणि उत्स्फूर्ततेनं प्रेमाची ज्योत जिवंत ठेवाल. एकत्र नवीन क्षितिजं एक्सप्लोर करण्याचा आनंद घ्या. नवीन आव्हाने स्वीकारून तुमची कौशल्ये आणखी वाढवा. आशावाद, उत्साह तुम्हाला यशाकडे नेईल. परस्पर संवादात कुशल व मुत्सद्दी व्हा. तुमच्या प्रामाणिकपणाची, सकारात्मक वृत्तीची प्रशंसा केली जाईल. आशावाद व धोका पत्करण्याचा स्वभाव यश देईल. नवीन संधींचा स्वीकार करून तुमचं कार्यक्षेत्र वाढवा. तुम्हाला आनंद देणाऱ्या व सक्रिय ठेवणाऱ्या शारीरिक ॲक्टिव्हिटींमध्ये व्यस्त रहा. सर्वांगीण कल्याणासाठी सकारात्मक मानसिकता ठेवा. तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही प्रेरणा, साहसाचे रोल मॉडेल ठरू शकता. जिज्ञासा आणि अन्वेषणाची भावना वाढेल.
LUCKY Sign – Camera
LUCKY Color – Green
LUCKY Number – 9
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
लव्ह लाइफमध्ये नात्यात स्थिरता आणि बांधिलकी जोपासा. दीर्घकालीन उद्दिष्टं आणि परस्पर विकासावर लक्ष केंद्रित करा. विश्वास व निष्ठा यावर आधारित मजबूत पाया तयार करा. हळूवारपणे होत असलेली स्थिर प्रगती प्रेमाकडे घेऊन जाईल. स्वतःला तुमच्या ध्येयाप्रती समर्पित करून परिश्रमपूर्वक काम करा. शिस्त, चिकाटीमुळे तुमची ओळख निर्माण होईल. व्यावसायिकता जोपासताना अनावश्यक संघर्ष टाळा. स्वतःच्या विकासावर, यशावर लक्ष केंद्रित करा. व्यावहारिक दृष्टिकोन हा दृढनिश्चय यशाकडे नेईल. काळजीपूर्वक लक्ष केंद्रीत करून योजना तयार करा. स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य देऊन संतुलित दिनचर्या राखा. तुमची शिस्त सर्वांगीण कल्याणासाठी उपयुक्त ठरेल. तुमच्या कुटुंबाला स्थिरता व आधार द्या. समर्पण देण्याच्या, जबाबदारी घेण्याच्या तुमच्या स्वभावाचं कौतुक केलं जाईल.
LUCKY Sign – Saltshaker
LUCKY Color – Yellow
LUCKY Number – 5
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
तुमच्या नातेसंबंधात व्यक्तिमत्व आणि स्वातंत्र्य आदींना स्थान द्या. नात्याच्या वाढीसाठी व त्यामध्ये मोकळेपणासाठी ते उपयुक्त ठरेल. अपारंपरिक आणि बौद्धिकदृष्ट्या उत्तेजक संबंधांचा शोध घ्या. बदल स्वीकारा. तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पना स्वीकारून त्याआधारे प्रगतीशील कामाच्या ठिकाणी योगदान द्या. तुमच्या मौलिकतेची कदर केली जाईल. तुमची मानवतावादी मूल्ये तुम्हाला ऑफिस डायनॅमिक्सद्वारे मार्गदर्शन करतील. अपारंपरिक दृष्टिकोन, अत्याधुनिक कल्पनांचा स्वीकारा कराल. तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेऊन जोखीम घ्या. सर्वांगीण कल्याण व मानसिकता यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या बुद्धीला चालना देणार्या कामामध्ये व्यस्त रहा. व्यक्तिमत्वाला प्रोत्साहन देणारं वातावरण तयार करा. तुमच्या कुटुंबातील विविधतेचा स्वीकार करा.
LUCKY Sign from above – An Artifact
LUCKY Color – Indigo
LUCKY Number – 10
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
लव्ह लाइफ मध्ये सहानुभूतीनं तुमचे नातेसंबंध दृढ होतील. तुमच्या जोडीदारासोबत भावनिक पातळीवर जोडले जाल. प्रेमाला शरण जा. स्वतःची क्रिएटिव्हिटी ओळखून त्याआधारे भावना व्यक्त करा. अंतर्ज्ञान, सर्जनशीलतेवर विश्वास ठेवा. तुमचा अनोखा दृष्टीकोन यश आणि पूर्तता आणले. स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून एखाद्या कटकारस्थानात अडकणे टाळा. स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करा. तुमची अंतर्ज्ञान व कलात्मक स्वभाव यशासाठी मार्गदर्शन करेल. कल्पनाशक्ती आत्मसात करून चौकटीबाहेर जाऊन विचार करा. कलात्मक अभिव्यक्ती द्वारे संतुलन शोधा. तुम्ही स्वप्न पाहण्यात रममाण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील कलात्मक अभिव्यक्तीला प्रोत्साहन द्या.
LUCKY Sign – Wooden Gate
LUCKY Color – White
LUCKY Number – 4
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.