मुंबई, 30 एप्रिल: सितारा – द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa – The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 30 एप्रिल 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
ही बाब कदाचित तुमच्या वैयक्तिक आवडीची असेल; मात्र तुम्ही एखाद्या अपारंपरिक गोष्टीबद्दल कन्व्हिन्स झाला असलात, तर त्यासह पुढे जाण्याची शक्यता आहे. तुमचे कामाचे प्लॅन आणि वैयक्तिक आवडी या दोन्हींवर एकत्रितपणे लक्ष देण्याची वेळ आहे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्यांच्या टीममध्ये हवे आहात आणि ती व्यक्ती यासाठी प्रयत्नही करील. दुतोंडी व्यक्तींवर विश्वास ठेवताना सावध राहा.
LUCKY SIGN – A Mask
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
एखाद्या संस्थेकडून त्वरित प्रतिसाद मिळेल. त्यावरून तुमची निवड होण्याची शक्यता जास्त आहे. तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव असल्यामुळे तुम्ही एक ध्येय समोर ठेवलं आहे. तुमच्या पालकांच्या आशीर्वादामुळे तुम्ही नक्कीच अचीव्हमेंट्स साध्य कराल. तुमची स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी एखादा स्पॉन्सर मिळेल. नवा प्रोजेक्ट आकर्षक, कुतुहल वाढवणारा वाटेल.
LUCKY SIGN – A well
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
स्वतःचा व्यवसाय सुरू करणं हे तुमचं स्वप्न आहे आणि तुम्ही ते सत्यात उतरवण्यासाठी खरोखरच परिश्रम घेत आहात. तुम्हाला या स्वप्नापासून कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही. या बिझनेससंबंधी तुमच्या भविष्यातल्या नियोजनाचं पुनरावलोकन करा. त्यासोबतच, दुसरी एखादी संधी चालून आल्यास त्याबद्दलही विचार करा. ती संधी थेट नाकारू नका. काही काळासाठी तुमच्या गरजा भागतील एवढी बचत तुमच्याकडे आहे.
LUCKY SIGN – A sports car
सिगारेटच्या धूराने त्वरित प्रसन्न होणारे श्री शंकर महाराज! आजही अनेकांसाठी आहेत गूढ
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
तुमच्या मनातल्या विचारांबाबत आतापर्यंत तुम्हाला स्पष्टता आली असेल. तुमचे विचार तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. कॉर्पोरेट क्षेत्रातल्या काही व्यक्ती बहुप्रतीक्षित उद्दिष्ट साध्य करतील. ज्या व्यक्ती संयम बाळगतात किंवा प्रयत्न करत राहतात त्यांना अपेक्षित गोष्टी मिळतातच. तुम्हाचीही लवकरच दखल घेतली जाईल. आउटिंगला जाण्याचा एखादा प्लॅन बनेल. त्यामुळे आनंदी व्हाल.
LUCKY SIGN – A ceramic vase
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
खासगी गोष्टींबाबत सार्वजनिक ठिकाणी चर्चा करणं टाळा. एखाद्या गोष्टीत नकळतपणे सहभागी व्हाल. आज संमिश्र स्वरूपाच्या भावना असतील. तुमच्याकडे आकर्षित झालेली एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करील. तुम्हाला भावनिकरीत्या कमकुवत झाल्यासारखं वाटेल. आत्ता तुमच्या मनात गोंधळ असेल, तर निर्णय घेणं पुढे ढकला. दीर्घ आणि खोल श्वसनाचे व्यायाम करा.
LUCKY SIGN – Red color
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
एखादी रोमांचकारी गोष्ट तुमच्या दिशेने येत आहे, ज्याबाबत खरं तर तुम्ही कसलंही नियोजन केलं नसेल, विचार केला नसेल. ही गोष्ट तुमच्या मार्गात नसूनही तुमच्याकडे येईल. तुम्ही गांभीर्यानं घेतलं तर ही एक चांगली संधी ठरू शकते. सर्वांचा सल्ला ऐका; मात्र अंतिम निर्णय तुम्ही स्वतःच्या मनानेच घ्या. कायदेशीर वर्तुळात असलेल्या व्यक्तींसाठी पुढचे काही दिवस आव्हानात्मक असतील.
LUCKY SIGN – A smartwatch
काळ्या तांदळाचे उपाय: जीवनातील समस्या दूर होतील, करिअर-व्यवसायातही मिळेल यश
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
स्पर्धा करणं ही चांगली गोष्ट आहे; मात्र ही स्पर्धा जिंकण्यासाठी कट-कारस्थान रचणं कधीही योग्य ठरत नाही. यामुळे ना तुमचा फायदा होतो ना समोरच्या व्यक्तीचा. सर्व व्यवहारांमध्ये तुम्ही पारदर्शकता ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचं हार्टब्रेक होऊ शकेल. यानंतर ती व्यक्ती तुमचा सल्ला मागेल. तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रकृतीच्या समस्या जाणवतील. त्याची चिंता वाटेल.
LUCKY SIGN – A patterned cushion
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
तुमचा दृष्टिकोन तुम्हाला आयुष्यात भरपूर पुढे नेईल. तुमच्या ओळखींमुळे भरपूर फायदा होईल; मात्र लोकांवर विश्वास ठेवणं सध्या जड जाईल. वरिष्ठ व्यक्ती किंवा अधिकारी असलेल्या व्यक्तींसाठी आव्हानात्मक काळ आहे. कामासाठी बरीच धावपळ करावी लागेल. तुमचा जोडीदार हा तुमचा सर्वांत मोठा टीकाकार आणि आधारस्तंभ असेल. एखाद्या मालमत्तेच्या विक्रीत रस असेल तर प्राथमिक चर्चा होऊ शकते.
LUCKY SIGN – An embroidery work
शनिदेवाचा प्रकोप टाळायचा असेल तर शिवलिंगावर अर्पण करा या 7 गोष्टी
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
एखादं काम करण्यासाठी लोकांकडे एक तर क्षमता नसते किंवा कौशल्य; मात्र, तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास परत मिळवा आणि तुमच्या समोर असलेली गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. एखाद्या गोष्टीबाबत पूर्णपणे माहिती घेण्यापूर्वीच ती रिजेक्ट करू नका. भविष्यात तुम्ही मोठे धाडसी निर्णय घ्याल.
LUCKY SIGN – A peacock
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
भूतकाळातला एखादा वाईट अनुभव पुन्हा येऊ शकतो; मात्र अगदी सारखेपणाने नाही. या गोष्टीमुळे घाबरून जाण्याची गरज नाही; मात्र तुम्ही त्यात पुन्हा अडकू शकता. नवीन उदाहरणांमुळे चांगले अनुभव मिळतील. तुमचं काम उच्चभ्रू व्यक्तींच्या गटात मांडण्याची संधी लवकरच मिळेल. पारदर्शक राहिल्यामुळे तुम्हाला भरपूर प्रशंसक मिळतील.
LUCKY SIGN – A celebrity
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
एखाद्या संकटाच्या वेळी तुम्ही एकटे पडाल अशी तुम्हाला भीती वाटत असेल, तर आत्ता तशी परिस्थिती नक्कीच नाही. वेळ कोणासाठी थांबत नाही, आणि सध्या वेगाने बदलत आहे. मागे पाहून जुन्या चुकांचा आढावा घ्यायला हवा. तुमच्या वागण्यात बदल झाला नाही, तर भूतकाळातल्या चुका पुन्हा पुन्हा समोर येत राहतील. एखादी आध्यात्मिक सहल घडू शकते आणि तिचं कदाचित त्वरित नियोजन होत असेल. तुम्ही जी ऊर्जा गमावली आहे ती तुमच्या मित्रांमुळे परत येईल.
LUCKY SIGN – A neon cloth
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
लग्नाचा विचार करत असलात, तर आत्ता भरपूर शक्यता आहे. समोर आलेल्या काही व्यक्तींमधून तुमच्या नशिबात असलेल्या व्यक्तीला तुम्ही निवडू शकाल. तुम्हाला जे हवं आहे, तेच तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीलाही हवं आहे; तुमच्याएवढे लकी नसल्याचा विचार ते करत असावेत. अशा व्यक्तींपासून सावध राहा. ते जळत असू शकतात. नकारात्मक मानसिकतेमुळे आयुष्यात काही पावलं मागं जाण्यास भाग पडेल.
LUCKY SIGN – Tree of life
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.