धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 7 एप्रिल : आपल्या देशाची जगामध्ये ओळख एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आहे. विविध जातीपातीचे धर्मापंथाचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. पण, काही वेळा या प्रतिमेला तडा देण्याचं काम काही समाजकंटकांच्या मार्फत केलं जातं. या परिस्थितीमध्ये शहरातील पोलिसांवर मोठी जबाबदारी असते. पोलीस हे समाजामध्ये महत्त्वाचा दुवा ठरतात. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखून शांतता प्रस्थापित करतात. मुंबई हे शहर देखील याला अपवाद नाही.
मुंबईतली धार्मिक विविधता ही कोणाला नवीन नाही. त्यामुळे कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला धार्मिक बाबी लक्षात घेऊनच समाजात सलोखा निर्माण करावा लागतो. मुंबईतील कुर्ला परिसर हा हिंदू – मुस्लिम बहुल भाग आहे. आणि या भागामध्ये कायदा सूव्यवस्था राखण हे तितकं सोपं नाही. त्यामुळे या सणावारांच्या काळात सारे कार्यक्रम शांततेत पार पाडणे हे कुर्ला पोलिसांचे तितकंच कौतुकास्पद आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
पोलिस सतर्क
मुंबईतील कुर्ला परिसरात सर्व जाती, धर्मातील लोक राहतात. ही मंडळी सर्व सण उत्सव गुण्या गोविंदाने साजरे केले जातात. कुर्ल्यात शिवजयंती, आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, नवरात्री, झुलेलाल जयंती, संदल, ईद, रमजान सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. शक्यता रमजान – ईदच्या महिन्यात कुर्ल्यातील बाजारपेठेत वस्तू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होते. अश्यावेळी इतर लोकांना त्रास होऊ नये. तसेच कोणताही प्रकारे गालबोट लागू नये यासाठी पोलिस सतर्क असतात. अश्यावेळी हे सण उत्सव शांततेत साजरी व्हावे यासाठी कुर्ला पोलीस नेहमी डोळ्यात अंजन घालून काम करत असतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विविध उपक्रम, बैठकांचे आयोजन केले जाते.
कसं चालतं काम?
15 मार्च 2022 रोजी कुर्ला पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालो. यावेळी माझी नियुक्ती झाली त्या दिवसापासून कुर्ल्यात उत्सवांना सुरुवात झाली. अश्यावेळी एक जबाबदार अधिकारी म्हणून सर्व प्रथम नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, मोलवी, पुजारी, अश्या महत्वाच्या घटकांना वेगवेगळ्या वेळेत एकत्रित बोलावून बैठका घेऊन समजावून सांगितलं जातं, असं कुर्ला वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र होवाळे सांगतात.
‘मी सांगलीमध्ये दंगली जवळून पहिल्या होत्या. याकाळात कश्याप्रकारे सामाजिक सलोखा राखला गेला पाहिजे हे माहीत होत. त्याच बरोबर यापूर्वी शिवाजीनगर, गोवंडी येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील कार्य केलं असल्यामुळे समाजामध्ये नागरिकांना कसं हाताळायच हे ठावूक असल्यामुळे कुर्ल्यात काम करताना अवघड जात नाही,’ असं त्यांनी सांगितलं.
Malpua Recipe : संपूर्ण मुंबईत फेमस असलेला कुर्ल्यातील मालपुआ कसा तयार होतो? पाहा Video
गालबोट लागत नाही
‘धार्मिक गोष्टसोबत आता शैक्षणिक दृष्ट्या कसे महिला, पुरुष, तरुण पिढी यांची कशी प्रगती होईल. यावर चर्चा करून त्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे एक पोलिस अधिकारी नसून मित्र असल्यासारखं सर्व सामान्य नागरिकांना वाटतं. आणि हे सर्व नियोजन करतांना समाजात बारीक लक्ष ठेवून योग्य व्यक्तीवर कारवाई करून, सामाजिक सलोखा समाजात राखण्यास मला माझे वरिष्ठ तसेच सोबत असलेले अधिकारी, अंमलदार सहकार्य करत असतात. त्यामुळे कुर्ल्यात प्रत्येक सण उत्सव उत्साहात साजरी केले जातात. त्याला कोणतेही गालबोट लागत नाही, असंही रवींद्र होवाळे यांनी सांगितलं.
मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भागात सामाजिक सलोख्यासाठी एक प्रकारे कुर्ला पॅटर्नची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यात शांतता कायम टिकवण्यासाठी सर्वांनीच या प्रकारच्या पॅटर्नची निर्मिती केली पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.