मुंबई, 9 एप्रिल : अदानी प्रकरणात जेपीसी नियुक्त करण्याची आवश्यकता नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे आता काँग्रेस नेत्यांकडून शरद पवारांना लक्ष्य केलं जात आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी याच मुद्द्यावरून शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अलका लांबा यांनी ट्विट करत पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मात्र अलका लांबा यांच्या या ट्विटचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार समाचार घेतला आहे.
नेमकं काय म्हटलं लांबा यांनी?
अलका लांबा यांनी शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाण साधला आहे. काही भीत असलेले स्वार्थी लोक आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी हुकमशाहाचे गुण गात आहेत. देशातील लोकांची लढाई एकटे राहुल गांधी लढत आहेत. असं लांबा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
फडणवीसांकडून टीकेचा समाचार
दरम्यान भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलका लांबा यांच्या या ट्विटचा चांगलाच समाचार घेतला आहे. सत्ता येईल, जाईल पण काँग्रेसच्या एका नेत्याने गेले 35 वर्ष त्यांच्यासोबत असलेल्या आणि चारावेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या एका ज्येष्ठ नेत्यावर अशा पद्धतीनं टीका करावी हे भयावह असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी हे राजकीय संस्कृती बिघडवत असल्याचा टोलाही फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये लगावला आहे.
Politics will come and go but this Tweet by a Congress leader on their long standing ally of 35 years and one of the India’s senior most political leaders and a 4 time CM of Maharashtra is appalling.@RahulGandhi is perverting India’s political culture ❗️ pic.twitter.com/84olg5FYOc
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 8, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.