कोटा, 19 एप्रिल : देशात दिवसेंदिवस अनैतिक संबंधाच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता नात्याला काळिमा फासणारी आणखी एक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने आपल्याच पुतणीसोबत लग्न केले तसेच तिला तब्बल 10 महिने ओलीस ठेवत तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.
ही धक्कादायक घटना कोचिंग सिटी कोटा येथील महावीर नगर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पोलिसांनी आता या मुलीला बाडमेर वरुन ताब्यात घेतले आहे. पीडितेला महिला निवारागृहात ठेवण्यात आले आहे. पोलीस आता पीडितेचा जबाब नोंदवणार आहेत. तसेच या प्रकरणाची कसून चौकशी करणार आहेत.
कोटा बाल कल्याण समितीच्या सदस्या मधुबाला शर्मा यांनी सांगितले की, 16 वर्षीय पीडित मुलगी दहावीत शिकते. चार भावंडांमध्ये ती तिसरी आहे. तिच्या दोन बहिणी विवाहित आहेत. वडील मजुरीचे काम करतात. समुपदेशन करताना पीडित मुलीने सांगितले की, ती जून 2022 मध्ये बाजारातून तिच्या घरी जात होती. त्याचवेळी वाटेत तिचा नातेवाईक भेटला, त्याने तिला दिशाभूल करत तिला बारां येथे घेऊन गेला.
दुसरीकडे मुलगी घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती न सापडून आली नाही. त्यामुळे ती हरवल्याची तक्रार महावीर नगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. दरम्यान, आरोपी काकाने बारां येथील मंदिरात तिच्यासोबत लग्न केले. त्यानंतर तिला 6 महिने बारां जिल्ह्यात ओलीस ठेवले. यानंतर 1 जानेवारीला तो पुन्हा बाडमेरला तिला घेऊन गेला. 4 महिने त्याने तिला बाडमेर येथे भाड्याच्या खोलीत ठेवले. यादरम्यान त्याने तिच्याशी अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवत तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी पीडित मुलीला बाडमेर येथून ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपीचा शोध सुरू आहे
आरोपी पीडित मुलीच्या घरी यायचा –
मधुबाला शर्मा यांनी सांगितले की, 14 वर्षीय तरुण हा या मुलीच्या दूरच्या नात्यातील काका असल्याचे दिसते. त्याचे मुलीच्या घरी येणे-जाणे होते. युवक मजुरीचे काम करतात. मुलीची मेडिकल चाचणी करण्यात आली आहे. तसेच सध्या, संरक्षणाची गरज असल्याने, अल्पवयीन मुलीला महिलांच्या निवारागृहात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.