संदीप मिश्रा (सीतापूर), 07 मे : मागच्या काही काळापासून उत्तरप्रदेशमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दरम्यान यूपीच्या सीतापूरमध्ये ऑनर किलिंगचे प्रकरण समोर आले आहे. येथे प्रेमविवाह केल्याच्या रागातून काकाने भरदिवसा धारदार शस्त्राने पुतणीचा गळा चिरून निर्घृण खून केला. खून केल्यानंतर काका स्वतःच चाकू घेऊन पोलीस आला. त्याच्या हातात रक्ताने माखलेला चाकू पाहून पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली.
काकांना ताब्यात घेत पोलीस कर्मचाऱ्यांनी चाकू काढून घेतला आहे. पोलीसांनी चौकशी करताच मी पुतणीचा खून केल्याची कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. खुनाच्या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच एएसपी सुशील चंद्रभान यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. ऑनर किलिंगचे हे प्रकरण बाजनगर येथे घडले आहे.
नवरीसोबत रूममध्ये गेला अन् तिथेच भयानक घडलं; लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, मृत संतरा गाझियाबादमध्ये राहत होती. गावातील रहिवासी रूपचंद्र मौर्य त्याच गावात रहायचा दरम्यान या दोघांचे प्रेमसंबंध तयार झाले. त्यानंतर दोघांनी पळून जाऊन लग्न केले. रूपचंद्र आधीच विवाहित आहे. गेल्या दहा दिवसांपासून रूपचंद्र आणि संतरा गावात राहू लागले होते. प्रेमविवाहामुळे संतरा यांच्या नातेवाईकांना राग आला होता.
शनिवारी दुपारी संतरा रूपचंद्र याच्या घरी असताना काका शाम सिंग यांनी रूपचंद्र यांच्या घरात घुसून पुतणी संतरा हिला घरातून ओढत चाकूने गळा चिरून निर्घृण खून केला. यामुळे खुनाच्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. खून केल्यानंतर काका श्यामू सिंग स्वतः रक्ताने माखलेल्या चाकूसह पोलीस ठाणे गाठले.
लग्नाची मिरवणूक निघणार तेवढ्यात धक्कादायक माहिती समजली आणि…
रूपसिंगच्या हातात चाकू पाहून उपस्थित पोलिसांमध्ये खळबळ उडाली. घाईगडबडीत पोलीस कर्मचाऱ्यांनी श्यामू सिंगला ताब्यात घेत त्याच्या हातातील चाकू काढून घेतला. पोलिसांनी आरोपी काकाला शस्त्रासह अटक केली आहे. या हत्याकांडानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.