लंडन, 13 मे : तुम्ही एखादी वस्तू वापरली आणि ती पुन्हा विकायला काढली. तर सेकंड हँड म्हणून त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा निम्मी किंवा त्यापेक्षाही कमी होते. म्हणजे तुम्ही त्या वस्तूसाठी खर्च केलेल्या पैशांपेक्षाही कमी पैसे तुम्हाला मिळतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक घड्याळ जे सेकंड हँडमध्ये त्याच्या मूळ किमतीपेक्षा कित्येक तरी पटीने जास्त किमतीला विकलं गेलं. हजाराच्या घरात असलेलं हे घड्याळ लाखोंच्या घरात गेलं. आता हे कसं काय शक्य आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
अवघ्या 7 हजार रुपयांचं हातातील हे घड्याळ, जे आता 41 लाख रुपयांना विकलं गेलं. यामागे खास कारण आहे. म्हणतात ना जुनं ते सोनं. हेच या घड्याळाच्या बाबतीत झालं. हे घड्याळ तब्बल 60 वर्षे जुनं आहे. 1963 सालातील हे विंटेज रोलेक्स सबमरिनर वॉच.
मीडिया रिपोर्टनुसार, हे घड्याळ ब्रिटनच्या रॉयल नेव्हीतील रेस्क्यू डायव्हर सायमन बर्नेट यांनी हे घड्याळ विकत घेतलं होतं. रोलेक्स सबमरिनर वॉच ही केवळ फॅशन ऍक्सेसरी नव्हती. पाण्यातही हे घड्याळ खराब व्हायचं नाही आणि खूप फायद्याचं होतं. सायमनने समुद्राखालील महत्त्वाच्या बचाव मोहिमांमध्ये त्याचा वापर केला होता. मग ते किती वेळ पाण्याखाली राहिले हे कळायचं. मात्र, आता ते स्टेटस सिम्बॉल बनलं असून श्रीमंत लोक त्याचा वापर करतात.
या 9 बिल्डिंगच्या आत जाणं सोडा बाहेरून पाहण्याचीही हिंमत होत नाही; आहे विचित्र कारण
60 वर्षांपूर्वी सायमन यांनी या घड्याळासाठी 70 पाऊंड म्हणजेच आजच्या काळातील सुमारे 7000 रुपये मोजले होते. 2019 मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्यांचं हे घड्याळ त्यांचा मुलगा पीटर बार्नेटला मिळालं.
मेट्रो यूकेच्या वृत्तानुसार, पीटर बर्नेट म्हणाला, माझ्या वडिलांनी सिंगापूरमध्ये पोस्टिंग असताना हे घड्याळ विकत घेतलं होतं. वडील सांगत असत, की त्या काळी ते कुटुंबासाठी खूप मोलाचं होतं. जेव्हा हे घड्याळ माझ्या हातात घालायचो तेव्हा वडील जवळ असल्यासारखेच वाटाचये. त्यामुळे ते विकण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता. पण नंतर मला वाटलं की मी योग्य ते केलं. हे घड्याळ रोज घालायला भीती वाटत होती. इतकं महागडं घड्याळ घालून मला चालता येत नव्हतं.
जगात हा असा एकमेव डॉग, दुसरा शोधून सापडणारच नाही; काय आहे याच्यात खास पाहा
पीटरने या घड्याळाचा ऑनलाईन लिलाव केला. त्याने त्याची किंमत 50,000 ते 60,000 पाऊंड म्हणजे सुमारे 55 ते 66 लाख रुपये ठेवली. पण 40,000 पाऊंड म्हणजेच अंदाजे 41 लाख रुपयांना या घड्याळाचा लिलाव झाला. TW Gaze ने आयोजित केलेल्या लिलावात हे घड्याळ विकलं गेलं. या घड्याळाची विक्री जितक्या किमतीत झाली, तितक्या किमतीत मर्सिडीजसारखी एक आलिशान गाडी खरेदी करता येईल. ब्रिटनमधीलच एका व्यक्तीने हे घड्याळ खरेदी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.