राजाराम मंडल (मधुबन), 11 मे : बिहारच्या मधुबन जिल्हा मुख्यालयाच्या जुन्या खादी स्टोअरजवळ राहणारी दिव्या कुमारी सध्या चर्चेत आहे. आठवीच्या वर्गात शिकणारी 12 वर्षीय दिव्या हिला चलता फिरता विकिपीडिया गर्ल म्हणून ओळखले जाते. दिव्याला भगवद् गीतेबद्दल इतके ज्ञान आहे की बरेच लोक गीतेतील महत्वाचे मुद्दे ऐकण्यासाठी तिच्याकडे येतात. त्याचबरोबर राजकारण आणि इतिहास जाणून घेण्यासाठी अनेक लोक तीच्याजवळ येतात. दरम्यान न्यूज 18 लोकलने देखील दिव्याला अनेक प्रश्न विचारले, ज्याची उत्तरे तिने अगदी सहज दिली.
दिव्याला तिच्या ज्ञानामुळे अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळाली आहेत. यामुळे तिच्या पालकांना त्यांच्या मुलीचा खूप अभिमान वाटतो. दिव्याला अभ्यास, नृत्य, राजकारण, इतिहास यांची आवड आहे.
संघर्ष हिच्या पायाखाली झुकतो, राज्यात 8 वी येत या मुलीने घातला नवा आदर्श
यामध्ये तिला तिच्या वडिलांचे मार्गदर्शन लाभले आहे. ती तिच्या मोठ्या बहिणीकडून युट्यूबवर विविध विषयांचे धडे घेत असल्याचीही माहिती आहे.
दिव्याच्या आईचे म्हणणे आहे की, तिची मुलगी पाच-सहा वर्षांची असल्यापासून कठीण प्रश्नांची उत्तरे देत आहे. तीच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे लोकांना अनेकदा आश्चर्यकारक धक्का बसला आहे. दिव्याला भगवद्गीता आणि इतिहासावर अनेक प्रश्न विचारण्यात आले, त्यावर ती अतिशय सहज आणि वेळ न घेता उत्तरे देते.
SSC CHSL Recruitment: 12वी पास उमेदवारांसाठी तब्बल 1600 जागांसाठी भरतीची घोषणा; लगेच करा अप्लाय
साधारणपणे 12 व्या वर्षी अशा प्रश्नांची उत्तरे दिल्याने अनेकांना आश्चर्य वाटते. भविष्यात आयएएस अधिकारी होऊन देशाची आणि समाजाची सेवा करण्याचे दिव्याचे स्वप्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.