नवी दिल्ली: रिक्षा आणि कारची भीषण धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कारने रिक्षाला धडक दिली आणि चालकाला 200 मीटर लांबपर्यंत फरफटत नेलं. या घटनेनंतर कार चालक फरार झाला आहे. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी तातडीने जखमी व्यक्तीला आरएमएल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन जप्त करून आरोपीला पोलिसांनी घटनास्थळीच पकडले आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे वय २५ वर्षे असून तो मुरादनगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे नाव फरमान असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघाताने दिल्लीतील कांझावाला अपघाताची आठवण करून दिली. सर्वांच्या अंगावर पुन्हा एकदा काटा आला. या घटनेत रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ही घटना फिरोजशाह रोज इथे घडल्याची माहिती मिळाली आहे.
Delhi | A man dragged for around 200 meters in Firoz Shah Road area after being hit by a car driven by another man. Details awaited. pic.twitter.com/kFxuKSqvZG
— ANI (@ANI) April 25, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.