नवी दिल्ली, 21 एप्रिल : रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्पर ट्रकला धडकल्याने फोर्ड इकोस्पोर्ट कारला आग लागली. यावेळी कारला आग लागताच कार चालवणारी महिला बेशुद्ध अवस्थेत दिसली. एका अनोळखी व्यक्तीने तिला पाहिले आणि त्याच्या हेल्मेटने खिडकी तोडून कारमधून महिलेला बाहेर काढण्यास मदत केली.
येरवडा येथील आगा खान पॅलेससमोरील नगर पुणे रोडवर ही घटना घडली. सकाळी 10.25 वाजताच्या सुमारास, महिलेने कार चालवत असताना समोर उभ्या असलेल्या टिप्परला धडकण्यापूर्वी अनेक गाड्यांना धडक दिली. काही वेळाने जेव्हा ती गाडीतून उतरली नाही तर एका अज्ञात व्यक्तीने कारजवळ येऊन खिडकी तोडून महिला चालकाला कारमधून बाहेर काढले.
तर समोरील बाजूस असलेल्या शांतीवन सॉफ्टवेअर हब येथील सुरक्षा रक्षकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याजवळ असलेल्या अग्निशमन यंत्राचा वापर त्यांनी यावेळी केला. तसेच काही वेळातच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यात मदत केली.
अग्निशमन दलाचे जवान सोपान पवार म्हणाले, “डंपरला धडकण्यापूर्वी महिलेने रस्त्यावरील दोन ते तीन गाड्यांना धडक दिली. त्यांच्या गाडीचे बोनेट डंपरखाली आल्याने इंजिनला आग लागली. या घटनेनंतर महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली असून तिचा रक्तदाब कमी होता. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले.”
घटनेनंतर कारला आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाचे प्रवक्ते नीलेश महाजन यांनी एक निवेदन जारी करून सांगितले की, “कारला आग लागल्याचे कारण स्पष्ट झाले नाही, परंतु महिलेला कारला आग लागल्याचे लक्षात आले नाही.” घटनास्थळावरून निघालेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांना कारमधून बाहेर काढले. उच्च तापमान किंवा टक्कर झाल्यामुळे कारला आग लागली, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे.”
फोर्ड इकोस्पोर्टने ट्रकला धडकण्यापूर्वी इतर अनेक गाड्यांना धडक दिली, यावरुन, ती महिला गाडी चालवत असताना बेशुद्ध पडली असावी, असे दिसून येते. गाडी चालवताना तिने नियंत्रण गमावले असावे, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.