मुंबई, 6 एप्रिल : ठाण्यात काल (बुधवार) ठाकरे गटाने जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. रोशनी शिंदे या शिवसेना पदाधिकारी महिलेला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ पोलीस आयुक्तालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. ठाकरे गटाच्या युवासेनेच्या सचिव दुर्गाताई भोसले-शिंदे या सुद्धा मोर्चात जोरदार घोषणा देत सरकारचा निषेध नोंदवत होत्या. मात्र, घोषणा देत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि रात्री त्यांची प्राणज्योत मालवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे ठाणे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर भावनिक पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
तुमच्या शहरातून (मुंबई)
‘काल आम्ही आमचा सर्वात मेहनती, उत्साही, दयाळू, संवेदनशील युवासैनिक गमावली. दुर्गा भोसले-शिंदे जी आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवणे अतिशय कठीण आणि दुःखद आहे. एक युवासैनिक आणि मित्र म्हणून त्यांचे जाणे माझ्यासाठी शब्दांत व्यक्त करणे, शक्यच नाही. ॐ शांती!’ असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
काल आम्ही आमचा सर्वात मेहनती, उत्साही, दयाळू, संवेदनशील युवासैनिक गमावली. दुर्गा भोसले-शिंदे जी आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवणे अतिशय कठीण आणि दुःखद आहे.
एक युवासैनिक आणि मित्र म्हणून त्यांचे जाणे माझ्यासाठी शब्दांत व्यक्त करणे, शक्यच नाही.
ॐ शांती! pic.twitter.com/Uvuc5SyEPs
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 6, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.