मुंबई, 12 एप्रिल : ‘अजितदादा असं काही करणार नाही. ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहे. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. ते स्वाभिमानी आहे, त्यांचा कणा नेहमी ताट असतो, बाणेदार असं नेतृत्व आहे. ते मिंध्याप्रमाणे जाऊन गुलामी करणार नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या बातम्यांचा पूर आला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
अजित पवार हे राष्ट्रवादीतून 15 आमदारासह बाहेर पडणार असं ट्वीट अंजली दमानियांनी केलं आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
‘असं आहे, त्या ज्या अंजली दमानिया आहे, त्यांना जर भाजपकडून माहिती मिळाली असेल तर त्यांनी जाहीर केली असेल. पण अजितदादा असं काही करणार नाही. ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहे. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. ते स्वाभिमानी आहे, त्यांचा कणा नेहमी ताट असतो, बाणेदार असं नेतृत्व आहे. ते मिंध्याप्रमाणे जाऊन गुलामी करणार नाही. शेवटी प्रत्येक जण व्यक्तिगत काही निर्णय घेत असतात. पण मी जे पाहतोय, अजितदादा मांडलिक होऊन कुणाचं काम करणार नाही’ असा विश्वास संजय राऊतांनी केला.
(महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर? 20 आमदार बंडाच्या तयारीत!)
अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहे. राज्यात शेतकऱ्यांवर संकट आलं आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे विरोधकांचं काम आहे, सत्ताधाऱ्यांच्या कानावर हा विषय घालावा लागणार आहे. अजितदादा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले आहे, असंही राऊत म्हणाले.
नाना पटोले काय बोलले हे मला माहिती नाही, त्यांनी कोणत्या विषयावर भूमिका घेतली हे मला माहिती नाही. शरद पवार यांची भेट घेतली, त्यांचे मत जाणून घेतले. एकत्र राहू काम करावे, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी पाऊल टाकले पाहिजे. एकत्र जर लढलो तर राज्यातून भाजप आणि त्यांच्या वाशिंग मशीनचं नामोनिशान राहणार नाही. त्यासाठी एकत्र येणे गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया सुद्धा पवारांच्या भेटीवर दिली.
(मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, अजितदादा शिंदे-फडणवीसांच्या भेटीला, राणेही पोहोचले, पण..)
‘पक्ष बांधणीसाठी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे हे राज्यभर दौरे करत आहे. पाचोऱ्यामध्ये 23 एप्रिल रोजी उद्धव ठाकरे सभा घेणार आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी सभा होणार आहे. पाचोऱ्यातील शिवसेनेचे नेते आर.ओ. पाटील यांचं निधन झाले, ते आमचे आमदार होते. त्यांच्या पुतण्याला त्यांनी आमदार केलं. तो पुतण्या गद्दार झाला, पळून गेला. आरो तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि सभेचा कार्यक्रम ठरला आहे’ अशी माहितीही राऊतांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.