मथुरा, 13 मे : लग्नाच्या आधीपासून जोडपं वेगवेगळी स्वप्न रंगवू लागतात. नवीन संसाराचा आणि जोडीदारासोबत जन्मोजन्मी राहण्याचा विचार करु लागतात. पण कितीही म्हटलं तरी जोडीदारात भांडण तंटे होतातच. ज्यामुळे कधी-कधी संसार अर्ध्यावर मोडतो. पण जर लग्न झाल्यानंतर ते लग्न काही तास सुद्धा टिकू शकलं नाही असं जर तुम्हाला सांगितलं तर? नक्की असं काय घडलं हे प्रत्येकालाच जाणून घ्यायचं असतं.
हे प्रकरण उत्तर प्रदेशातील मथुरा येथील आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्रीनंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी वधू-वर लग्न मोडण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. अवघ्या काही तासांपूर्वी अग्नीला साक्षीदार मानून सात जन्मासाठी प्राथना केली. पण ते लग्न काही तास देखील टिकलं नाही. यामागचं कारण आणि हे प्रकरण समोर आल्यानंतर लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली.
बायको प्रियकरासोबत बेडवर असताना कॅमेरा घेऊन पोहोचला नवरा आणि… Video कैद झाला संपूर्ण प्रकार
हे प्रकरण वृंदावन कोतवाली परिसरातील गौरानगरचे आहे. येथे राहणाऱ्या आनंद अग्रवालचे लग्न हरियाणातील होडास येथे राहणाऱ्या रेखासोबत निश्चित झाले होते. मुलाच्या लग्नामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. हसत खेळत संपूर्ण कार्यक्रम देखील पार पडला.
10 मे ला लग्न आणि यानंतर 11 मे रोजी सकाळी विदाईचा कार्यक्रम देखील पार पडला. सगळं काही ठिक चाललं होतं. पण अचानक दुसऱ्या दिवशी दोघांनी लग्न का मोडलं असा प्रश्न प्रत्येकाला पडला.
शरीर संबंधासाठी नवऱ्याचा घाणेरडा खेळ; बायकोला म्हणाला, तू त्याच्यासोबत बेड शेअर कर आणि मी…
पण खरी काहाणी तर सकाळी सुरु झाली. जेव्हा घरातील लोक सूनेची सकाळी उठण्याची आणि दुसऱ्या विधी करण्याची वाट पाहात होते. तेव्हा त्यांच्या कानावर सूनेचे अपशब्द पडले. सून घरच्यांना शिविगाळ करु लागली. ज्यानंतर घरातील संपूर्ण वातावरण बिघडले आणि अखेर हे प्रकरण पोलिसात पोहोचले.
तिथे या सूनेच्या भावाने जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
नवऱ्याने सांगितले की त्याची बायको वेडी आहे आणि तिचे मानसिक संतुलन ठिक नाही. त्याला फसवून हे लग्न करण्यात आलं. यावर मुलीच्या भावाने आधी नवरदेवाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण अखेर तिच्या भावाला हे मान्य करावंच लागलं की त्याची बहिण मानसिकदृष्ट्या आजारी आहे.
भावाच्या या वक्तव्यानंतर मुलाच्या बाजूने फसवणूक केल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली गेली आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांनी लग्न मोडून तडजोड करण्याचे मान्य केले आहे. पोलीस आता या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.