मुंबई, 14 एप्रिल : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्यानंतर आता युवासेने नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवाशांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी ‘काही समाजकंटकांची टोळी’ असा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे यांनी आज बीडीडी चाळीतील रहिवाशांशी पत्राच्या माध्यमातून संवाद साधला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
सध्या काही समाजकंटकांची टोळी स्वतला काही कंत्राट मिळावीत म्हणून मराठी माणसांना 500 चौ. फूटाचे चांगल्या दर्जाचे घर न मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.
(राज्याच्या राजकारणातील नवी घडामोड, प्रकाश आंबेडकर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!)
‘गेली 25 वर्षे आपण या बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची वाट पाहत आहात, त्यामध्ये स्वतःची घरे भरू इच्छिणारे काही समाजकंटक आडकाठी आणत आहेत. खंत हीच वाटते की, जर हा प्रकल्प अपूर्ण राहिला तर वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सामान्य मराठी माणसांचे मुंबईमधील घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही आणि याचे पूर्ण पाप त्याच समाजकंटकांवर असेल, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.
‘महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने मार्गी लागत असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास मी वरळीचा आमदार म्हणून सदैव आपल्या सोबत आहे, असं आश्वासनही आदित्य ठाकरेंनी दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.