नवी दिल्ली: ब्रिटनची आर्थिक परिस्थिती खूप उत्तम आहे अशी सध्या स्थिती नाही. मात्र तरीसुद्धा कोट्यवधी रुपये खर्च करुन आज किंग चार्ल्सचा राज्याभिषेक सोहळा केला जात आहे. जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. लंडन शहराला यासाठी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शाही थाट आणि सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. डोळे दिपवणारा असा सोहळा आज पार पडत आहे. मात्र एवढे पैसे नेमके येतात कुठून याबाबत लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
राजा चार्ल्स III च्या राज्याभिषेकासाठी 1,025 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. राज्याभिषेकाचा संपूर्ण खर्च ब्रिटिश सरकार उचलणार आहे, कारण सुरुवातीपासूनच हा खर्च सरकार उचलत होतं. 1,025 कोटी रुपयांची ही रक्कम 1953 मध्ये राणी एलिझाबेथ II च्या राज्याभिषेकासाठी खर्च करण्यात आली होती, त्यावेळी ब्रिटिश सरकारने 15 कोटी 42 लाख रुपये खर्च केले होते.
ऑनलाईन Game खेळताना एकमेकांवर जडलं प्रेम; अल्पवयीन जोडप्यासोबत शेवटी मोठा ‘गेम’
ब्लूमबर्गने नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार, रॉयल फॅमिलीने जून 2022 मध्ये सांगितले की 2021-22 मध्ये, ब्रिटिश राजघराण्याने तिथल्या नागरिकांच्या करातून 10.24 कोटी पौंड, म्हणजे सुमारे 940 कोटी रुपये खर्च केले. ब्रिटनमध्ये राजघराण्यावर खर्च होणाऱ्या पैशाला सार्वभौम अनुदान म्हणतात. ब्रिटनच्या 6 कोटी 73 लाख लोकसंख्येपैकी प्रत्येक नागरिकाला सार्वभौम अनुदानावर सुमारे 120 रुपये खर्च करावाच लागतो.
देशातील लोक टॅक्स भरत असताना मात्र राजघराण्याला यामध्ये सूट मिळत असल्याने तिथल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रत्येक ब्रिटिश नागरिकाला 3.25 लाख पौंडांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेवर 40 टक्के वारसा कर भरावा लागतो. जो साधारणपणे विचार केला तर 30 कोटी रुपयांच्या आसपास पोहोचतो. राजा चार्ल्सने त्यांची आई राणी एलिझाबेथ II यांच्याकडून वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेवर एक पैसाही भरला नाही.
Backstreet Boys Video: भर कॉन्सर्टमध्ये गायकाने आपली अंडरवेअर…, मुंबई शोमध्ये अश्लील प्रकार
1993 मध्ये तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान जॉन मेजर आणि राजघराण्यामध्ये एक करार झाला होता. याच करारानुसार राजाकडून त्याच्या वारसाकडे जाणाऱ्या मालमत्तेवर वारसा कर आकारला जात नाही. पण राजघराण्याला देण्यात आलेल्या या विशेष सूटला ब्रिटनमधील एका वर्गाने भेदभाव म्हटले आहे.
हा विभाग राजघराण्यावर खर्च होत असलेल्या पैशाची उधळपट्टी म्हणतो. आज ब्रिटनमधील लोकांसमोरील सर्वात मोठे आव्हान वाढती महागाई आणि घर खर्च कसा चाालवायचा हे आहे. वाढत्या महागाईमुळे घरातील खर्च वाढत आहे. मात्र असं असताना किंग चार्ल्सच्या राज्याभिषेकावर 1 हजार कोटींहून अधिक रुपये खर्च केले जात असल्याने लोकांमध्ये नाराजी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.