नीलम कराळे, प्रतिनिधी
पुणे, 22 एप्रिल : वाल्मिकी रामायणास भारतीय परंपरेत अत्यंत महत्वाचे स्थान आहे. आजवर विविध माध्यमातून रामायण आपल्यासमोर आले आहे. आता हे महाकाव्य 10 खंड असलेल्या एका संचाच्या अद्वितीय रुपात आपल्याला वाचायला मिळणार आहे. तब्बल 1 लाख 65 हजार इतकी किंमत आणि 45 किलो असलेल्या अभूतपूर्व अशा या रामायणाची निर्मिती वेदिक कॉसमॉस या प्रकाशन संस्थेने केली आहे. या विशेष रुपात सादर होणाऱ्या रामायणाचे प्रकाशन देशात पहिल्यांदाच पुण्यात झाले.
वाल्मिकी रामायणाचं महत्त्व
तुमच्या शहरातून (पुणे)
‘ देशात भावार्थ रामायण, तुलसी रामायण, कंब रामायण, ओरिया दंडी रामायण असे जवळपास २०० रामकथा लिहिण्यात आल्या आहेत. अनेक लेखकांनी आपल्या लेखणीतून रामकथेचे वर्णन केले आहे, त्या सर्वांप्रती मला आदर आहे. मात्र या राम कथांमध्ये अनेक आंतरिक भेद आहेत. या भेदांपासून दूर जाण्यासाठी आणि राम कथेबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर मिळविण्यासाठी एकच पर्याय आहे. महर्षी वाल्मिकींनी लिहिलेले रामायण हाच तो पर्याय आहे, असं मत असे मत अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले.
वाल्मिकी रामायण ही चमत्कारावर आधारित रामकथा नसून, विज्ञान, अध्यात्म, व्यवस्थापन अशा सर्वच विषयांचे ज्ञान देणारी ही कथा आहे. त्यामुळेच लोकांनी खासकरून तरुण पिढीने वाल्मिकी रामायण आवश्य वाचले पाहिजे,’ असं आवाहन गिरी महाराज यांनी यावेळी केलं.
कसा आहे ग्रंथ?
स्वरोस्की क्रिस्टलने सजवलेल्या या ग्रंथामध्ये, रामायणातील महत्वाचे प्रसंग 200 पेक्षा जास्त चित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. हे भव्य पुस्तक वाचण्याची सोय असलेल्या विशेष लाकडी पेटीसह हा ग्रंथ वाचकांना मिळणार आहे.
गुरुच्या मेष राशीमधील प्रवेशाचा तुम्हाला फायदा होणार का? Video
रामायणाच्या निर्मितीसाठी आम्हाला पाच वर्षे लागली. एकूण दहा पुस्तकांचा संच असलेल्या या ग्रंथाच्या निर्मितीसाठी पर्यावरणपूरक आणि उच्च प्रतीच्या साधनांचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुस्तक संचासाठी डिझाईन करण्यात आलेला विशेष लाकडी बॉक्स, रामायणातील महत्वाच्या प्रसंगावर आधारित 200 हून अधिक उत्कृष्ट चित्रे आणि मौल्यवान स्वरोस्की क्रिस्टल्सची सजावट ही या ग्रंथाची काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. वाल्मिकी रामायणाच्या सात खंडातील 24,000 मूळ संस्कृत श्लोकांबरोबरच हिंदी आणि इंग्रजीतील भाषांतर देखील यामध्ये देण्यात आले आहे.सुरूवातीला ही प्रत व्हिनस स्टेशनरी येथील शॉपमध्ये मिळणार आहे, अशी माहिती शिरीष राजेश यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.