मुंबई, 24 एप्रिल- सलमान खान जितका त्याच्या सिनेमामुळे चर्चेत असतो तितकाच त्याच्या लव्ह लाईफमुळे देखील चर्चेत असतो. सोमी अली, संगीता बिजलानीसह या अभिनेत्याच्या आयुष्यात अनेक मुली आल्या, पण सलमान आजतागायत लग्नबंधनात अडकलेला नाही. सध्या सलमान खानच्या लव्ह लाईफची जोरदार चर्चा सुरू आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात प्रश्न येतो की, सलमानची पहिली गर्लफ्रेंड कोण होती?
प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांची नात आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीची मावशी शाहीन जाफरी ही बॉलिवूड सुपरस्टार सलानाची पहिली मैत्रीण होती. सलमानला शाहीन जाफरी इतकी आवडत होती की, त्याने आपल्या घरच्यांची शाहीनशी ओळखही करून दिली होती.
वाचा-रणबीर-रणवीरसारखा दिसणाऱ्या ‘या’ मुलाचं संजय लीला भन्साळींसोबत आहे खास कनेक्शन
असे म्हटले जाते की, सलमान शाहीनची कॉलेजबाहेर तासन् तास वाट पाहत होता. तेव्हा सलमानने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला नव्हता. विशेष म्हणजे सलमान फक्त 19 वर्षांचा होता. सलमान मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकत होता. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असताना तो शाहीनच्या प्रेमात पडला. सलमानच्या घरच्यांनाही शाहीन खूप आवडू लागली होती, त्यांना तिला आपल्या घरची सून बनवायची होती, पण अचानक असं काही घडलं ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती.
रिपोर्ट्सनुसार, याच काळात संगीता बिजलानीने सलमान खान आणि शाहीनच्या आयुष्यात एन्ट्री केली होती. संगीताच्या येण्याने सलमानची शाहीनशी असलेली ओढ संपुष्टात येऊ लागली आणि नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. संगीता जेव्हा सलमानला भेटली तेव्हा तिचं देखील ब्रेकअप झालं होतं. 1980 मध्ये मिस इंडिया किताब मिळवलेल्या संगीता बिजलानीचे तत्कालीन बॉयफ्रेंड बिंजू अलीसोबत ब्रेकअप झाले होते.
असं म्हटलं जातं की जेव्हा संगीता सलमानला भेटली तेव्हा तिचं ब्रेकअप झालं होतं. सलमान ज्या हेल्थ क्लबमध्ये जायचा, त्याच हेल्थ क्लबमध्ये ती जायची. तिथेच दोघांची भेट झाली. मग दोघांची ओळख झाली, मैत्री झाली आणि मग या मैत्रिचे रूपांतर प्रेमात झालं. या दोघांनी जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केले. हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचलं, पण मग सोमी अलीने सलमानच्या आयुष्यात प्रवेश केला आणि त्याने संगीतासोबत ब्रेकअप केलं. अशी काही सलामनची पहिली वहिली लव्हस्टोरी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.