गणेश दुडम, पुणे, 14 मे : तळेगावमध्ये जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. भरदुपारी नगरपरिषदेच्या आवारातच चार ते पाच जणांनी आवारे यांना गोळ्या घातल्या. याशिवाय कोयत्यानेही वार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणात नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांच्या मुलाचा हात असून त्यानेच ही हत्या घडून आणल्याचं समोर आलंय. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींकडून ही माहिती मिळाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आलीय. यातील आरोपींनीच हत्येचं कारण सांगितलं. यामुळेच गौरव खळदेला पोलिसांनी अटक केली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून बदला घेण्याच्या इराद्याने किशोर आवारे यांची भानू खळदे यांच्या मुलाने ही हत्या घडवून आणली.
रागाच्या भरात विवाहिता माहेरी निघाली; पण रस्त्यातच घडलं भयानक कांड, बीड हादरलं
तुमच्या शहरातून (पुणे)
पोलिसांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये सीओंच्या दालनासमोर एका विषयावरून भानूप्रताख खळदे आणि किशोर आवारे यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी किशोर आवारे यांनी भानू खळदे मारलं असा गुन्हा दाखल केला होता. आपल्या वडिलांचा अपमान झाला, सर्वांसमोर वडिलांना मारहाण झाली यावरून गौरवच्या मनात राग निर्माण झाला होता. त्यानंतर गौरवने टीम तयार करून हत्या घडवून आणल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. याबाबत अधिक तपास केला जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतलं आहे.
माजी नगरसेवक भानू खळदे यांच्या विरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार किशोर आवारे यांनी नगरपरिषदेच्या सीईओकडे केली होती. मात्र बांधकाम साईटच्या मार्गालगतची ही वृक्षतोड परवानगीने होती असा दावा भानू खळदे यांनी केला होता. मात्र यावरून आवारे यांनी भानू खळदे यांना सर्वांदेखत मुस्काडीत लावली. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलगा गौरव खळदेने हत्येचा कट रचला अशी माहिती पिंपरी चिंचवडचे एसीपी पद्माकर घनवट यांनी दिली.
नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली, तेंव्हा त्यांनी गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली दिली असल्याचंही पोलिसांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.