जळगाव, 23 एप्रिल : उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जळगावच्या पाचोऱ्यामध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एकेरी भाषेमध्ये विखारी टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘उद्धवजी, आपण देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांचा एकेरी उल्लेख करीत म्हणालात की, ‘मोदीच्या मागे- पुढे कुणी नाही’ आपण हे विसरलात की, आदरणीय मोदीजींच्या सोबत देशातील कोट्यवधी जनतेचे आशीर्वाद आहेत. हा देशच त्यांचे कुटुंब आहे. लहानपणीच कुटुंबाचा त्याग केलेल्या माणसाला कुटुंबाचा मोह कसा राहणार? कुटुंबाच्या मोहात तर तुम्ही अडकला आहात. म्हणूनच तुमच्या जवळची माणसे सोडून गेली आणि तुमची ही गत झाली आहे’, असं प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिलं.
उद्धवजी, आपण देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. @narendramodi जी यांचा एकेरी उल्लेख करीत म्हणालात की “ मोदीच्या मागे- पुढे कुणी नाही ” आपण हे विसरलात की, आदरणीय मोदीजींच्या सोबत देशातील कोट्यवधी जनतेचे आशीर्वाद आहेत. हा देशच त्यांचे कुटुंब आहे. लहानपणीच कुटुंबाचा त्याग केलेल्या…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) April 23, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.