दिल्ली, 8 मे : दिल्लीत जंतर-मंतरवर कुस्तीपट्टूंचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी पंजाबमधून मोठ्या प्रमाणावर शेतकरी जंतर-मंतर इथं पोहोचले. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडले. दुसऱ्या बाजूला कुस्तीपट्टूंनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. कुस्तीपट्टूंच्या समर्थनासाठी रविवारी शेतकरी दिल्लीतील जंतर मंतरवर पोहोचले होते. यात अनेक शेतकरी नेत्यांचाही समावेश होता. यावेळी संयुक्त किसान मोर्चाने केंद्र सरकारला इशारा दिला होता. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं होतं की, आरोपी बृजभूषण शरण सिंहला 21 मे पर्यंत अटक व्हायला हवी.
राजस्थानमध्ये हवाई दलाचं मिग-21 विमान कोसळलं, दोन महिलांचा मृत्यू
#WATCH दिल्ली: जंतर-मंतर पर पहलवानों के प्रदर्शन में शामिल होने के लिए किसानों ने पुलिस बैरिकेड्स तोड़े।
पहलवान यौन उत्पीड़न के आरोपों को लेकर WFI प्रमुख और भाजपा सांसद बृजभूषण शरण सिंह के खिलाफ कार्रवाई की मांग कर रहे हैं। pic.twitter.com/mi9kofW2mJ
— ANI_HindiNews (@AHindinews) May 8, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.