मुंबई, 1 एप्रिल : आयपीएल 2023 ला 31 मार्च पासून सुरुवात झाली आहे. आयपीएलचा तिसरा सामना आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात खेळवला जात आहे. या दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या नव्या सीजनमधील पहिला सामना खेळताना त्यांचा दुखापतग्रस्त माजी कर्णधार रिषभ पंतची आठवण ठेवली आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि भारताचा स्टार खेळाडू रिषभ पंत सध्या दुखापतग्रस्त आहे. रिषभच्या कारला 30 डिसेंबर 2022 ला भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिषभ गंभीर जखमी झाला होता. यामुळे रिषभच्या पायावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून तो सध्या दुखापतीतून सावरत असलयाने यंदाच्या आयपीएलमध्ये खेळत नाही. परंतु रिषभ सध्या दिल्ली कॅपिटल्स सोबत आयपीएलमध्ये खेळत नसला तरी त्याच्या संघाने एक खास गोष्ट करून त्याची आठवण ठेवली आहे.
A lovely picture – Rishabh Pant jersey in the dugout. pic.twitter.com/h1wnXgafsI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 1, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.