भाग्यश्री प्रधान आचार्य
डोंबिवली, 28 एप्रिल : डोंबिवली येथील उंबार्ली टेकडी, मलंगगड परिसर, सातपुल येथील खाडी परिसरात विविध दुर्मीळ पक्षी आणि प्राणी यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. यामुळे याठिकाणी दुर्मिळ पक्षी आणि प्राणी पाहण्यासाठी अनेक डोंबिवलीकर भेट देत असतात. याच ठिकाणी 14 वर्षीय अर्णव पटवर्धन याने 200 दुर्मिळ पक्ष्यांचे निरीक्षण केले आहे. यामध्ये अर्णव याने काही स्थलांतरित पक्ष्यांचे छायाचित्रही टिपले आहेत.
पक्षी निरीक्षणाची आवड
तुमच्या शहरातून (मुंबई)
अभ्यास आणि खेळाच्या वयातच अर्णवला पक्षी निरीक्षणाची आवड असल्याचे अर्णवच्या आई बाबांनी ओळखले. त्यानंतर आठ वर्षांच्या अर्णवला डोंबिवलीतील पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी ते घेऊन जावू लागले. आतापर्यंत अर्णव याने डोंबिवलीत 200 विविध पक्ष्यांच्या प्रजाती पहिल्या आहेत. त्याचा या कामाबद्दल लेखक आणि पक्षी निरीक्षक मारुती चितमपल्ली यांनी देखील पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे. नुकताच अर्णव याला आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार जाहीर झाला असून डोंबिवलीचा शिरपेचात त्याने मानाचा तुरा खोवला आहे.
कोणते पक्ष्यांचे केले निरक्षण?
मी नुकताच तिरंदाज हा पक्षी डोंबिवलीत पहिला आहे. यासोबतच दलदल ससाणा, चक्रांग, तूतवार, पाणटीवळा, वेडा राघू, रक्त सुरमा, रणगोजा, मोठ्या ठिपक्यांच्या गरुड, नदी सूरमय, चमचा असे विविध पक्षी पाहिले आहेत. वयाच्या आठव्या वर्षापासून मी पक्षी निरीक्षण करताना पक्ष्यांची संख्या प्रचंड कमी होत असल्याचे निरीक्षणात आले आहे. काही नागरिक माशांना फरसाण सारखे खाद्यपदार्थ खायला टाकतात. यामुळे माशांच्या शरीरात विष तयार होते आणि मासे मरतात. हेच मासे पक्षी खातात. त्यामुळे त्यानंही विष बाधा होते आणि ते मृत्युमुखी पडतात. इतकेच नव्हे तर डोंबिवलीतील भोपर गावात पूर्वी फार पक्षी दिसत. मात्र, तिथे सुरू असलेल्या बांधकामामुळे पक्षी तेथे फारसे फिरकत नसल्याचे माझे निरीक्षण आहे, असं अर्णवने सांगितले.
मुक्या जिवांसाठी तो शंकरच! तुम्हालाही वाटेल हेवा, एकदा पाहाच हा VIDEO
शाबासकीची थाप मला कायम प्रेरणा देईल
मारुती चितमपल्ली यांची भेट आणि त्यांनी दिलेली शाबासकीची थाप मला कायम प्रेरणा देईल. ती थाप अविस्मरणीय आहे. पुढेही मी पक्षी निरीक्षण आणि पक्ष्यांचे छायाचित्र काढत राहणार आहे, असंही अर्णवने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.