दिल्ली, 18 मे : केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. किरण रिजिजू यांना कायदा मंत्री पदावरून हटवण्यात आलं असून त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल यांची वर्णी लागली आहे. तर किरण रिजिजू यांच्याकडे पृथ्वी विज्ञान मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. दोन मंत्र्यांच्या विभागात बदल करताना किरण रिजिजू यांच्या जागी संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे कायदा मंत्रीपदाचा भार सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनाकडून मंत्रिमंडळातील फेरबदलाची माहिती देण्यात आलीय.
मुख्यमंत्री पद अन्यथा काहीच नाही; एका VCवर डीकेंनी एक पाऊल घेतलं मागे
राष्ट्रपती भवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सदस्यांच्या खात्यांमध्ये फेरबदलाला मंजुरी दिलीय. यानुसार किरण रिजिजू यांच्याकडे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल यांना कायदा मंत्री पदाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे.
अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सध्या असलेल्या खात्यांशिवाय कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या मेघवाल हे संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक राज्यमंत्री आहेत. रिजिजू यांना जुलै २०२१ मध्ये रविशंकर प्रसाद यांच्या जागी कायदा मंत्री म्हणून नियुक्त केलं होतं. रिजिजू हे गेल्या काही काळापासून न्यायालयातील नियुक्त्यांबाबत असलेल्या कॉलेजियम सिस्टिमविरुद्ध केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.