चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 16 एप्रिल : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे नाराजी नाट्य समोर आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात चंद्रकांत पाटील यांचा समावेश नाही. अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील मात्र मुंबईबाहेर होते.
तुमच्या शहरातून (पुणे)
केंद्रीय मंत्री अमित शाहंच्या दौऱ्यात चंद्रकांत पाटील यांना स्थान नाही?
महाराष्ट्र भूषण पूरस्काराच्या कार्यक्रमासाठी अमित शाह यांनी आज मुंबईत हजेरी लावली. मात्र, अमित शाह यांच्या दौऱ्यात चंद्रकांत पाटील यांचा समावेश नाही. अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील मात्र मुंबईबाहेर होते. आज सकाळी चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात अवयवदान कार्यक्रमाला हजेरी लावली. तर संध्याकाळी पुण्यात दिवंगत बापट यांच्या श्रद्धांजली सभेलाही ते उपस्थित होते. भाजपाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मुंबईत पार पडलेल्या बैठकीलाही चंद्रकांत पाटील गैरहजर होते. भाजपात चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांचे अतिशय निकटवर्तीय सहकारी म्हणून समजले जातात. मग तरीही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यापासून लांब राहणं का पसंत केलं? हे उमजण्यापलीकडचं आहे. बाबरी संबंधीच्या वादग्रस्त स्टेटमेंटवरून अमित शाह हे पाटील यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. तेही कारण यामागे असल्याचं बोललं जात आहे.
वाचा – ‘जे जातील तो त्यांचा वैयक्तिक निर्णय, पण राष्ट्रवादी..’ अखेर पवारांनी मांडली भूमिका
अमित शाहंनी सांगितल्या महाराष्ट्राच्या 3 परंपरा
कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सामाजिक काम करणाऱ्या समाजसेवकाच्या सन्मान सोहळ्यासाठी आलेला हा इतका मोठा जनसागर मी पहिल्यांदाच पाहतोय. इतक्या कडक उन्हात बसलेले तुम्ही सर्वजण हेच सांगतात की तुमच्या मनात अप्पासाहेब यांच्यासाठी किती प्रेम, सन्मान आणि श्रद्धा आहे. असा मान, सन्मान, श्रद्धा ही फक्त त्याग, समर्पण आणि सेवेतूनच मिळते. अप्पासाहेबांमध्ये हे सर्व दिसतं. तुमचं प्रेम, विश्वास हेच त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. गर्दीचं अनुकरण करू नका, तुम्ही असं काही करा की गर्दी तुमच्या पावलावर चालेल. आज लाखो लोक इथं आलेत असं अमित शाह म्हणाले.
मी 12 वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहे. इतिहासाचा विद्यार्थी आहे. देशविदेशाचा इतिहास वाचला. लक्ष्मीचा आशीर्वाद कित्येक पिढ्यांपर्यत असतो. मी हेसुद्धा पाहिलं आहे की एकाच कुटुंबात अनेक पिढ्या वीर जन्माला येतात. सरस्वतीची कृपाही अनेक पिढ्यांपर्यंत असते. पण समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्यांपर्यंत असल्याचं पहिल्यांदाच पाहिलं असल्याचंही अमित शाहांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.