नवी दिल्ली : केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. 14 अॅप सध्या बंद करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी गटांकडून वापरण्यात येणारे १४ मेसेंजर मोबाइल अॅप्लिकेशन्स ब्लॉक केले आहेत. Cripwiser, Enigma, SafeSwiss, Vikrame, Mediafire, Briar, Beechat, Nandbox, Conion, IMO, Element, Second Line, Jangi, Threema अशा अॅपचा यामध्ये समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अनेक एजन्सींना याबाबत माहिती मिळाली, हे App दहशतवादी संघटनेतील लोक काश्मीर खोऱ्यातील ऑन-ग्राउंड वर्कर्स (OGWs) सोबत संवाद साधण्याचं माध्यम म्हणून वापरत आहेत. मात्र ह्या App ला भारतात परवानगी नाही. भारतीय कायद्यानुसार माहिती मिळविण्यासाठी संपर्क साधता येत नाही. एजन्सींनी अनेक वेळा अॅप व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
Central Government blocks 14 mobile messenger apps. It is reported that terrorists used these mobile messenger apps to spread the message and receive messages from Pakistan.
— ANI (@ANI) May 1, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.