मुंबई, 22 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये शनिवारी 30 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात गुजरातने लखनऊचा पराभव केला आहे. गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जाएंट्सवर 7 धावांनी विजय मिळवला असून यंदाच्या आयपीएल मधील 4 था सामना जिंकला आहे.
ऐकना क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 135 धावा केल्या. गुजरातकडून हार्दिक पांड्याने 66, रिद्धिमान साहाने 47, विजय शंकरने 10 धावा केल्या इतर कोणत्याही खेळाडूला दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. लखनऊच्या गोलंदाजांनी गुजरातच्या 6 विकेट्स घेतल्या यात कृणाल पांड्या आणि मार्कस स्टॉइनिसने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर अमित मिश्रा आणि नवीनने प्रत्येकी 1 विकेट घेतली. गुजरातने लखनऊला विजयासाठी 136 धावांचे आव्हान दिले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.