मुंबई, 15 एप्रिल : आयपीएल 2023 मधील 21 वा सामना लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात पारपडला. या सामन्यात पंजाबने लखनऊ जाएंट्सचा पराभव केला. पंजाब किंग्सने या सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवला आहे.
उत्तरप्रदेशातील एकना स्टेडियमवर शनिवारी लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत लखनऊने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. या सामन्यात लखनऊकडून कर्णधार केएल राहुलने सर्वोत्तम धाव संख्या केली. त्याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करून 56 चेंडूत 74 धावा केल्या. यासह केएल राहुल ने आयपीएलमध्ये 4 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. याशिवाय लखनऊकडून के मेयरने 29, कृणाल पांड्याने 18, स्टॉइनिसने 15 धावा केलेय. इतर कोणत्याही खेळाडूला दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. पंजाबीकडून सॅम करनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. रबाडाने २ तर हरप्रीत, रझा आणि अर्शदीप सिंह या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतल्या.
लखनऊने पंजाब किंग्सला विजयासाठी 160 धावांच आव्हान दिल असताना, पंजाबकडून सिकंदर रझाने संघासाठी सर्वोच्च धावसंख्या केली. सिकंदर रझाने 41 चेंडूत 57 धावा केलया. यासोबतच पंजाबकडून हरप्रीत सिंह भाटियाने 22, मॅथ्यू शॉर्टने 34, शाहरुख खानने 23 धावा केलया तर इतर खेळाडूंना दोन अंकी धाव संख्या करणे मुश्किल झाले. अखेरच्या ओव्हरमध्ये दोन्ही संघातील सामना अत्यंत रोमांचक झाला ओव्हरमधील 4 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना फलंदाज शाहरुख खान याने ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर चौकार मारून सामना जिंकला. पंजाब किंग्सने लखनऊने दिलेले आव्हान 2 विकेट्स आणि 3 चेंडू राखून पूर्ण केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.