मुंबई, 15 एप्रिल : मागील काही काळापासून खराब फॉर्मात असलेला केएल राहुल आता पुन्हा फॉर्ममध्ये परतल्याचे पाहायला मिळत आहे. आयपीएल 2023 मधील 20 व्या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने पंजाब किंग्स विरुद्ध विस्फोटक फलंदाजी करून आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. हा विक्रम नोंदवताना राहुलने ख्रिस गेलं सह किंग कोहलीच्या विक्रमाला देखील मागे टाकले आहे
उत्तरप्रदेशातील एकना स्टेडियमवर लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल 2023 मधील सामना पारपडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जाएंट्सने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. तर पंजाबला विजयासाठी 160 धावांच आव्हान दिल. या दरम्यान कर्णधार केएल राहुलने मैदानावर चौफेर फटकेबाजी करून 56 चेंडूत 74 धावा केल्या. के एल राहुल ने 74 धावा करताना 8 चौकार आणि 1 षटकार लगावला.
🚨 Milestone 🚨
4⃣0⃣0⃣0⃣ runs and counting for @klrahul in #TATAIPL 👏👏
Follow the match ▶️ https://t.co/OHcd6Vf5zU #LSGvPBKS pic.twitter.com/NWXTyJbLm0
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.