मुंबई, 09 मे : तुम्ही अंडी, केळी खाल्ली असतील, यापासून बनवलेले पदार्थ चाखले असतील, यापासून ब्युटी प्रोडक्टस बनवून त्याचाही वापर केला असेल. पण एका व्यक्तीने अंडी आणि केळी एकत्र मातीत गाडली. त्यानंतर चमत्कार घडला. मातीत अंडी, केळी पुरल्यानंतर त्याचा असा परिणाम झाला की कुणी विचारही केला नसेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
काही लोक काही ना काही प्रयोग करत असतात. अशा जुगाडाचे, लाइफ हॅकचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशाच हॅकपैकी एक हा अंडी आणि केळ्याचा हॅक ज्याचा परिणाम पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. असा परिणाम पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही तोंडात बोटं घालाल.
गार्डनिंग करणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ही व्यक्ती मातीत केळी आणि अंडी पुरतेय त्यानंतर त्यावर टोमॅटोच्या बिया टाकते. याशिवाय या व्यक्तीने दुसरं काहीच वापरलं नाही. तुम्ही पुढे पाहाल तर काही दिवसांतच कमाल झाली आहे. तिथं चक्क टोमटोचं रोप फुललं.
औषध गोळ्यांची रिकामी पाकिटं खूप कामाची, पैशांचीही होईल बचत; त्यांचं काय करायचं पाहा VIDEO
व्यक्तीने दोन-तीन केळी घेतली आहेत. त्यासोबत दोन तुटलेली आणि एक पूर्ण अंड घेतलं आहे. तुम्ही हवं असल्याचं अंड्याचं कवचही वापरू शकता. त्यानंतर या व्यक्तीने जमिनीत 14-16 इंचाचा खड्डा बनवला. त्यात अंडी, केळी ठेवली. त्यावर माती घातली. या मातीवर जे रोप हवं त्या बिया टाकायच्या. या व्यक्तीने टोमॅटोच्या बिया टाकल्या.
केळी आणि अंडी मातीत कुजतात आणि ते खताप्रमाणे कार्य करतात. यामुळे झाडांना पोषण मिळतं. वेगळ्या खताची गरजच पडत नाही.
याला म्हणायचं काय? कबुतराला पाहून सर्व हैराण; तुम्ही सांगू शकता का याचं नाव?
Gary Pilarchik (The Rusted Garden) यूट्युब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
अनेकांना हा जुगाड आवडला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.