मुंबई, 1 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सीजनला शुक्रवार पासून सुरुवात झाली आहे. आयपीएल 2023 चा तिसरा सामना लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरु आहे. परंतु आयपीएलमध्ये देखील के एल राहुलचा खराब फॉर्म त्याची पाठ सोडताना दिसत नाही. सलामीसाठी मैदानात आलेला के एल राहुल केवळ 8 धावा करून बाद झाला.
भारताचा स्टार क्रिकेटर के एल राहुल सध्या खराब फॉर्मातून जात आहे. मागील काळात भारताकडून अनेक सामने खेळताना के एल राहुल स्वस्तात बाद झाला. के एल राहुलचा हा फॉर्म आयपीएलमध्ये सुधारेल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना होती परंतु असे काहीही घडताना दिसत नाही. लखनौ सुपर जाएंट्सच्या होम ग्राउंडमध्ये सुरु असलेल्या सामन्यात के एल राहुल पुन्हा फलंदाजीत फ्लॉप होताना पाहायला मिळाला. सलामीची मैदानात आलेल्या के एल राहुलला दिल्ली संघाच्या चेतन साकरीया याने बाद केले.
KL Rahul after every match #LSGvDC pic.twitter.com/2FzUewvg90
— Vivek Gautam (@Imvivek04) April 1, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.