मोहन जाधव, देवगड, 07 एप्रिल : मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये ट्रक आणि मरुती इस्टीलो कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन लहानग्या नातवांसह आजीचा समावेश आहे. कोकणात जात असताना हा अपघात झाला. मृतांमध्ये सहा महिन्यांच्या चिमुकलीचा समावेश असून दोघे जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तावडे कुटुंबिय कारमधून बोरीवलीहून देवगडला जात होते. त्यावेळी माणगाव तालुक्यातल्या कशेणे गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला. या अपघातात दोन चिमुकल्यांसह एका वृद्धेचा मृत्यू झाला. रिवान दर्शन तावडे आणि रित्या दर्शन तावडे आणि वैशाली विजय तावडे यांचा मृत्यू झाला. वैशाली या रिवान आणि रित्या यांच्या आजी होत्या. यात रित्याचे वय अवघे सहा महिने तर रिवान ३ वर्षांचा होता.
तुमच्या शहरातून (मुंबई)
नागपूर पोलिसांना बॉम्बने उडवण्याची धमकी; फोन केला अन् म्हटला मुलीचा मृतदेह…
या अपघातात दर्शन तावडे आणि श्वेता तावडे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून तावडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.