मुंबई, 3 एप्रिल : बारसू रिफायनरीवरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. 1 मे रोजी झालेल्या महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी आपण बारसूमध्ये जाणार असून त्यानंतर सभा घेणार असल्याचं जाहीर केलं. ठाकरेंच्या या घोषणेनंतर महायुती चांगलीच आक्रमक झाली आहे. 6 मे रोजी उद्धव ठाकरे बारसूमध्ये जाणार आहेत, याच दिवशी महायुती बारसू रिफायनरीच्या समर्थनात प्रत्युत्तर मोर्चा काढणार आहे.
रत्नागिरीमध्ये 6 मे रोजी युतीचे नेते शक्तीप्रदर्शन करणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपचे माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजप नेते प्रमोद जठार मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.
उद्धव ठाकरे उतरणार असलेल्या हेलिपॅडपासूनच युतीच्या नेत्यांचा मोर्चा निघणार आहे, त्यामुळे ठाकरे गट आणि शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते आमनेसामने उभे ठाकणार आहेत.
पवारांच्या ‘गुगली’नंतर काँग्रेसची ‘फिल्डिंग’, ‘मातोश्री’च्या पव्हेलियनवर नवी प्लॅनिंग!
येत्या 6 तारखेला मी बारसूला जाऊन लोकांना भेटणार आहे आणि बोलणार आहे. कसं काय तुम्ही मला आडवू शकता?. काय आहे बारसूमध्ये, तो काय पाकव्याप्त काश्मिर नाही. तो माझ्या महाराष्ट्राचा भाग आहे. 6 तारखेला बारसूला जाणार आहे आणि त्यानंतर सभा घेणार आहे, असं उद्धव ठाकरे महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेत म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.