विपिन कुमार दास, प्रतिनिधी
दरभंगा, 22 मे : देशात दिवसेंदिवस दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बलात्कार, आत्महत्येच्या घटना सातत्याने वाढत आहेत. यातच आता बिहारच्या दरभंगा येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. वर्गमित्रांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अनेक दिवस सामूहिक बलात्कार केला. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
या आरोपींनी पीडितेचे दरभंगा येथून अपहरण करून तिला समस्तीपूर आणि मधुबनी येथे नेले. यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. महिला पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत अल्पवयीन पीडित मुलीने सांगितले की, ती कोचिंग क्लासवरुन घरी परतत असताना दुचाकीवर आलेल्या आरडीएक्स राज आणि प्रियांशूने तिला जबरदस्तीने त्यांच्या दुचाकीवर बसवले आणि लहेरियासराय येथील हॉटेलमध्ये नेले. हॉटेलमधील 204 क्रमांकाच्या खोलीत विपुल नावाचा मुलगा आधीच होता. पीडित मुलगी ही विपुलला अभ्यासादरम्यान ओळखत होती, असेही तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या हॉटेलमध्ये तीन तरुणांनी या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडितेला घर सोडण्याच्या बहाण्याने दरभंगा रेल्वे स्थानकावर आणले. तेथून भागलपूरचे तिकीट काढले. पीडितेने त्यांना विचारले असता, हे प्रकरण शांत होईपर्यंत ते जिल्ह्याबाहेर राहणार असल्याचे सांगितले. ट्रेन समस्तीपूरला पोहोचल्यावर विपुलने अल्पवयीन मुलाला जेवणाच्या बहाण्याने स्टेशनबाहेर आणले. इथे स्टेशनच्या बाहेर एक स्कॉर्पिओ उभी होती, त्यात आणखी काही मुलं बसली होती. या स्कॉर्पिओमध्ये पीडितेला बसवण्यात आले आणि तिथे तिला इंजेक्शन देण्यात आले, त्यामुळे ती बेशुद्ध झाली.
जेव्हा पीडितेला शुद्ध आली तेव्हा ती मधुबनी जिल्ह्यातील एका गावात होती. यानंतर विपुलने पीडितेला तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. त्यानंतर विपुल व इतर आरोपींनी त्याला मधुबनीहून दरभंगा येथे आणले आणि किलाघाट नदीच्या पुलाजवळ सोडून पळून गेले. याप्रकरणी पीडितेच्या अर्जावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस तिन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.
प्रभारी एसडीपीओ बिरजू पासवान यांनी सांगितले की, अपहरण आणि सामूहिक बलात्काराची ही घटना 13 मे रोजी घडली. आपल्यासोबत सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार अल्पवयीन विद्यार्थिनीने केली आहे. याप्रकरणी महिला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. सध्या मुलीचे मेडिकल करण्यात आले आहे. हॉटेलकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली आहे, मात्र हॉटेलचालकाने अद्याप पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिलेले नाही. अशा स्थितीत हॉटेलचालकाच्या भूमिकेचीही चौकशी केली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.