अंजली सिंग राजपूत (लखनौ), 15 एप्रिल : या वर्षी जानेवारीमध्ये लखनौमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक बुरखा घातलेली महिला स्विगी बॅग घेऊन फिरताना दिसत होती. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांना जाणून घ्यायचे होते की ही महिला कोण आहे? स्विगीमधली डिलिव्हरी गर्ल आहे की आणखी कोणी?
हे जाणून घेण्यासाठी लोकल 18 टीम जुन्या लखनौच्या जनता नगरीमध्ये गेली, जिथे रिजवाना तिच्या तीन मुलांसोबत एका अतिशय अरुंद गल्लीत एका खोलीत दिसली. तेव्हा तिने सांगितले होते की ती स्विगीसाठी काम करत नाही, उलट तिने ती बॅग 50 रुपयांना विकत घेतली होती. अखेर, या तीन महिन्यांत स्विगी गर्ल म्हणून देशभरात प्रसिद्ध झालेल्या या महिलेच्या आयुष्यात किती बदल झाला हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा लोकल 18 तिच्या घरी पोहोचली.
चक्क दुचाकीवर केली योगासने आणि सूर्यनमस्कार, विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, पाहा Video
त्यामुळे रिजवाना थोडी खुश दिसत होती. सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा खूप फायदा झाल्याचे ती म्हणाली. आर्थिकदृष्ट्या ती खूपच कमकुवत होती, त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिचे घर उभा केलं आहे. घर अजूनही एका खोलीचे असलं तरी तिच्या घराला घरपण सोशल मिडीयातील लोकांनी दिलं आहे. या घरात तिच्यासह तीन घेऊन ती राहत असते.
रिजवानाने सांगितले की, माझा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर ती जेव्हा रस्त्यावर येते तेव्हा लोक तिला व्हायरल गर्ल म्हणून ओळखतात. दरम्यान पहिल्या दोन महिन्यात ती विकणारा माल खूप खपला परंतु मागच्या काही दिवसांपासून तिचा विकणारे साहित्य कमी प्रमाणात विकले जात आहे. याचे कारण विचारले असता ती म्हणाली की तिलाही कारण माहित नाही.
दरम्यान तिचा पती तीन वर्षांपासून बेपत्ता आहे. मागच्या तीन वर्षांपासून तो भेटला नाही. पंरतु घर चालवण्यासाठी ईदनंतर ती भाड्याने दुकान उघडणार आहे, घरोघरी विक्री करण्याऐवजी दुकानात ठेवून विक्री करणे चांगले आहे. यासाठी ती दुकान गाळा शोधत आहे.
हम साथ साथ हैं! व्यावसायिक ते कीर्तनकार एकाच घरात; तब्बल 61 जणांची जम्बो फॅमिली, पाहा Video
अद्याप दुकान सापडले नसले तरी आणि ते जेथे मिळते तेथे भाडे खूप महाग आहे, परंतु अद्याप शोध सुरू आहे. रिझवानाने पूर्ण महिना उपवास ठेवला आहे. ती म्हणते की, उपवासाच्या वेळीही ती स्विगी बॅग घेऊन दररोज अनेक किलोमीटर चालते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.