मुंबई, 04 एप्रिल : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कमेंटेटर आकाश चोप्राला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती आकाश चोप्राने स्वत: दिलीय. आकाश चोप्राने त्याच्या युट्यूब चॅनेलवर कम्युनिटी पोस्टमध्ये याबद्दल सांगितलं असून कोरोनामुळे आयपीएल २०२३मध्ये काही दिवस कमेंट्री करू शकणार नाही असेही म्हटले आहे.
आयपीएलमध्ये जिओ सिनेमासाठी आकाश चोप्रा कमेंट्री करतो. त्याने युट्यूब चॅनेलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये म्हटलं की, कोरोनाने पुन्हा स्ट्राइक केलाय. काही दिवसांसाठी कमेंट्री बॉक्समध्ये दिसणार नाही.
काही दिवस कमेंट्री बॉक्समध्ये दिसणार नाही असं सांगताना त्याने आपण युट्यूबलासुद्धा कमी असेन असं आकाश चोप्राने म्हटलं. गळा खराब असून आवाज बिघडेल. वाईट वाटून घेऊ नका, देवाची कृपा लक्षणे सौम्य आहेत असं आकाश चोप्रा म्हणाला.
IPL 2023 CSK vs LSG : माही मार रहा है, धोनीने गाजवलं मैदान, केला नवा रेकॉर्ड
आकाश चोप्राने कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलंय. आकाश चोप्रा क्रिकेटमध्ये हिंदी कमेंट्री करतो. आतापर्यंत अनेकदा त्याच्या कमेंट्रीवरून वादही निर्माण झाला होता. यंदाच्या आयपीएल हंगामात जिओ सिनेमासोबत त्याचा करार आहे. याआधी त्याने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कसाठी काम केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.