मुंबई, 18 एप्रिल : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हे दोघेही आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यावेळी आमने सामने आले होते. दोघांमध्ये टशन बघायला मिळाली होती. दरम्यान, मैदानातली ही टशन आता सोशल मीडियापर्यंत पोहोचली आहे. विराट कोहलीने इन्स्टाग्रामवरून सौरव गांगुलीला अनफॉलो केलं आहे. आरसीबी विरुद्ध दिल्ली सामन्याआधी त्याने असं केल्याचं म्हटलं जात आहे. याआधी तो सौरव गांगुलीला फॉलो करत होता.
दिल्ली विरुद्ध आरसीबी सामन्यात १८ व्या षटकावेळी आरसीबी विकेटच्या शोधात होती. तेव्हा दिल्लीच्या डगआऊटजवळ कोहली क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. त्याने एक जबरदस्त असा झेल घेत आरसीबीला यश मिळवून दिलं. हा झेल घेतल्यानतंर कोहलीने डगआऊटमध्ये बसलेल्या सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंग यांच्याकडे पाहिलं. सामना संपल्यानंतर कोहली आणि गांगुली यांनी एकमेकांशी हातही मिळवले नाही. याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला.
मॅक्सवेल आणि फाफचा झंजावात थांबवणं धोनीलाच जमलं, पाहा धोनीने घेतलेल्या कमाल कॅचचा Video
सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष असताना दोघांमध्ये वाद होता. विराट तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करत होता. कोहलीने दुबईत झालेल्या टी२० वर्ल्ड कप २०२१ नंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडून एकदिवसीय संघाचं कर्णधारपदही काढून घेतलं होतं. कोहलीने कर्णधारपद काढून घेतल्यानंतर म्हटलं की काही तास आधीच याबद्दल माहिती मिळाली. तर गांगुलीने म्हटलं होतं की, माझं विराटशी बोलणं झालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.