दिल्ली, 06 मे : आयपीएलची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत 48 सामने झाले असून प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघांमध्ये चढाओढ सुरू आहे. यात नितीश राणाच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सचाही समावेश आहे. दरम्यान, त्याच्यासाठी एक धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. नितीश राणाची पत्नी साची मारवाहचा नुकताच दोन बाईकस्वारांनी पाठलाग केल्याचा प्रकार घडलाय. त्यामुळे त्याच्या कुटुंबात भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांना मेलवर तक्रार मिळाली होती. या तक्रारीत म्हटलं होतं की, घरी जात असताना कीर्ती नगरजवळ दोन मुलांनी पाठलाग केला. यावेळी गाडीलाही धक्का दिला. याचा व्हिडीओ साचीने केला होता.
ऑफिसच्या कामानिमित्त साची बाहेर पडत होती तेव्हा दोन दुचाकीस्वारांनी तिचा पाठलाग करायला सुरुवात केली. यावेळी त्यांची धावत्या कारला धडकही बसली. सुरक्षितपणे घरी पोहोचल्यानंतर साचीने पोलिसात तक्रार दाखल केली तेव्हाही पोलिसांकडून धक्कादायक असं उत्तर मिळालं.
टीम इंडियाचे 4 मॅच विनर WTC Final आधीच OUT, रोहित शर्माचं वाढलं टेन्शन
क्रिकेटरच्या पत्नीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन दुचाकीस्वारांचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबत तिने लिहिलं की, दिल्लीतील एक नेहमीचा दिवस. मी ऑफिसमधून घरी परतत होते. तेव्हा या दोन मुलांनी माझ्या कारला अनेकदा धडक दिली. मला नाही माहिती की ते माझा पाठलाग का करत होते?
साचीने पोलिसांत तक्रार देण्यासाठी कॉल केल्यानंतर मिळालेल्या उत्तराबद्दलही सांगितलं आहे. तिने म्हटलं की, या प्रकरणाची माहिती जेव्हा मी दिल्ली पोलिसांना दिली तेव्हा त्यांच्याकडून मला सांगण्यात आलं की, तुम्ही घरी सुरक्षित पोहोचला आहात तर राहू द्या. पुढच्या वेळी अशी घटना घडली तर नंबर लिहून घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.