मुंबई, 05 मे: लखनौमध्ये सोमवारी (2 मे) झालेल्या आयपीएल मॅचमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार भांडण झालं. या वादानंतर क्रिकेटमधील शिष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विराट-गौतमची वागणूक ही ‘जंटलमेन्स गेम’ अशी ओळख असलेल्या क्रिकेटच्या स्पिरिटविरुद्ध असल्याचं काही चाहत्यांचं म्हणणं आहे. तर, काही चाहत्यांना प्रश्न पडला आहे की क्रिकेट खेळण्याचा आणि जंटलमन असण्याचा काय संबंध आहे? ‘झी न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे. सध्या जगातील 12 देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. यात तीन फॉरमॅट्स आहेत – टेस्ट क्रिकेट, वन-डे क्रिकेट आणि टी-20 क्रिकेट. दर चार वर्षांनी वन-डे क्रिकेटचा वर्ल्डकप आयोजित केला जातो. ज्यामध्ये 12 देश सहभागी होतात. तर, दर दोन वर्षांनी टी-20 वर्ल्डकप आयोजित केला जातो. ज्यामध्ये 16 देश भाग घेतात.
IPL 2023 : विराट गंभीरच्या वादात युवराज सिंहची उडी, दोघांना दिला ‘हा’ सल्ला
क्रिकेटची सुरुवात इंग्लंडमध्ये झालेली आहे, हे आपल्याला माहितीच आहे. ब्रिटिशांना पूर्वी ‘गोरे साहेब’ मानलं जाई. म्हणून त्यांनी शोधलेल्या क्रिकेटला ‘जंटलमेन्स गेम’ म्हणत असावेत, असा काहींचा अंदाज असू शकतो. मात्र, हा अंदाज चुकीचा आहे. क्रिकेट या शब्दाच्या फुलफॉर्ममध्ये त्याचा खरा अर्थ दडलेला आहे.
CRICKET या शब्दातील प्रत्येक अक्षराला स्वत:चा एक विशेष अर्थ आहे. या अर्थामुळेच क्रिकेटला ‘जंटलमन्स गेम’ म्हणतात. C म्हणजे Customer Focus, R म्हणजे Respect for Individual, I म्हणजे Integrity, C म्हणजे Community Contribution, K म्हणजे Knowledge Worship, E म्हणजे Entrepreneurship & Innovation आणि T म्हणजे Teamwork. क्रिकेट या एका शब्दामध्ये जंटलमनचे सर्व गुण दडलेले आहेत.
धोनी फिर आ रहा है! MS Dhoni ची जीवनगाथा पुन्हा मोठ्या पडद्यावर
पूर्वीपासून क्रिकेटला जंटलमेन्स गेम मानलं जातं. त्यामुळे जेव्हा-केव्हा क्रिकेटच्या मैदानावर हिंसा, वाद आणि फिक्सिंगसारख्या घटना समोर येतात तेव्हा चाहते टीक करण्यास सुरुवात करतात. त्यांच्या मते, क्रिकेट खेळाडू खेळभावना विसरत चालले आहेत.
क्रिकेट शब्दाच्या फुल फॉर्ममध्ये त्याचा खरा अर्थ दडलेला असला तरी त्याच्या हिंदी किंवा मराठी नावाचा ‘जंटलमेन’ या शब्दाशी काहीही संबंध येत नाही. क्रिकेटला हिंदीमध्ये ‘गोलगट्टम लकड़ पट्टम दे दनादन प्रतियोगिता’ असं म्हणतात तर मराठीमध्ये ‘चेंडूफळी’ म्हणातात. बॉलरला मराठीमध्ये गोलंदाज म्हणतात आणि बॅट्समनला फलंदाज म्हणतात. अंपायरला मराठीमध्ये पंच तर हिंदीमध्ये निर्णायक म्हटलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.