मुंबई, 29 मार्च : भारताचा स्टार क्रिकेटर आणि कर्णधार रोहित शर्मा सध्या त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. भारताकडून फलंदाजी करताना त्याने अनेकदा रेकॉर्ड ब्रेक खेळीकरून संघाला विजय मिळवून दिला आहे. आयपीएलमध्ये देखील रोहितचा दबदबा पाहायला मिळत असून त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. रोहित शर्मा सध्या क्रिकेट आणि प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर असला तरी लहानपणी क्रिकेटचे साहित्य खरेदी करण्यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
रोहित शर्मा चा लहानपणीचा मित्र आणि भारताचा माजी गोलंदाज प्रज्ञान ओझा याने रोहितच्या आयुष्यातील संघर्षमय आठवणी जागवल्या. तो एका मुलाखतीत म्हणाला, “रोहित मध्यमवर्गीय कुटुंबातुन आला आहे. त्याच्या रोहित लहान असताना त्याच्या वडिलांची कमाई ही फारशी नव्हती. त्यामुळे क्रिकेटर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोहित आजोबांकडे राहत होता. आमचे एकदा क्रिकेट किटवर बोलणे सुरु होते. तेव्हा रोहित भावुक झाला आणि त्याने मला सांगितले की, त्याने क्रिकेट किट घेण्यासाठी घरोघरी दुधाचे पॅकेट विकले होते. आज रोहित ज्या स्थरावर आहे ते पाहून मला मित्र आणि सहखेळाडू म्हणून त्याचा खूप अभिमान वाटतो”.
प्रज्ञान ओझा पुढे म्हणाले, “मी रोहित शर्माला प्रथमच अंडर-15 राष्ट्रीय क्रिकेट शिबिरात भेटलो होतो. तेव्हा फारच आक्रमक खेळी करायचा. त्याचा संघात फार दबदबा होता कारण त्याची बॅटिंग स्टाईल ही फार खास होती. काहीवेळा गोलंदाज म्हणून मी त्याची विकेट देखील घेतली आहे. सुरुवातीला तो फारसा बोलायचा नाही पण, हळूहळू आमची मैत्री वाढू लागली”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.