वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे : हृदयविकाराचा झटका फक्त वयोवृद्धांनाच येऊ शकतो असं काही नाही, तर याचा धोका तरुण आणि आता तर मुलांनाही आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
क्रिकेट खेळायला गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातील हडसपार भागातील असून वेदांत धामणगावकर असे मुलाचे नाव आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे वेदांत हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. त्यावेळी अचानक त्याला छातीत दुखू लागल्यामुळे त्यांनी त्याच्या वडिलांना कळवले.
तुमच्या शहरातून (पुणे)
वडिलांनी तात्काळ त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाण्यास सांगितले. दुसऱ्या रुग्णालयात पोहोचताच त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी वेदांत चा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आलं.
राज्याच्या नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, हवामान खात्याची गूड न्यूज!
14 वर्षांच्या वेदांतला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. वेदांचच्या जाण्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
पाऊस गेला पण आता उकाडा करणार घायाळ, विदर्भ 43 पार
काही शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे मुलं दुपारची बाहेर खेळायला जातात. जर तुम्ही तुमच्या मुलांना दुपारी बाहेर खेळायला पाठवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. राज्यात आधीच उष्माघाताने बळी जात आहे. उन्ह वाढलं आहे आणि अशा परिस्थितीत मुलांना भर उन्हात खेळणं जीवघेणं ठरू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.