दिल्ली, 28 एप्रिल : नवी दिल्लीतील जंतर मंतरवर 23 एप्रिल 2023 पासून पुन्हा एकदा देशातील दिग्गज कुस्तीपट्टू आंदोलनाला बसले आहेत. ऑलिम्पियन कुस्तीपट्टू विनेश फोगाटने कुस्ती महासंघातील अधिकारी महिला कुस्तीपट्टूंना धमक्या देत असल्याचा आरोपही केलाय. बृजभूषण शरण सिंह विरोधातील लैंगिक शोषणाची तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं तिने म्हटलंय. तर केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं की, केंद्र सरकारसाठी खेळ आणि खेळाडू यांना नेहमीच प्राधान्य दिलं आहे. कधीच खेळाडुंना मिळणाऱ्या सुविधांसोबत तडजोड केली नाही आणि करणारही नाही.
अनुराग ठाकुर यांनी एका पत्रकार परिषदेत दावा केला की त्यांनी जानेवारी 2023 मध्ये हिमाचल प्रदेशचा दौरा रद्द करून 12 तास पैलवानांसोबत चर्चा केली. त्यांचे ऐकून घेतलं. रात्री दोन अडीच वाजता पत्रकार परिषद घेतली आणि पैलवानांना विचारूनच त्यावर देखरेख समिती स्थापन करण्यात आली. मात्र केंद्रीय मंत्र्यांचा हा दावा बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी फेटाळून लावला आहे.
IPL 2023 Point Table : राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी, CSKला पराभवासह डबल दणका
विनेश फोगाटने रात्री माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, क्रीडा मंत्र्यांनी 12 तासच काय पण एकूण 12 मिनिटांचा वेळही दिला नाही. तर बजरंग पुनियानेसुद्धा असा आरोप केला की, क्रीडा मंत्र्यांनी त्यानंतर एकदाही भेटण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा आम्ही प्रयत्न केला तेव्हा त्यांचे अधिकारी एवढंच सांगतात की साहेब बिझी आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून साहेब बिझी आहेत काय असा प्रश्न पुनियाने विचारला.
बजरंग पुनिया म्हणाला की, मंत्री सांगतायत की त्यांनी 12 तास आमच्याशी चर्चा केली. एकदा तुम्ही क्रीडा मंत्र्यांना विचारा किती वेळ खेळाडुंसोबत ते होते. दोन चार मिनिट खेळाडुंसोबत थांबले. त्यांचे अधिकारीच खेळाडूंसाठी मध्यस्थी करत होते. तेव्हापासून आजपर्यंत एकहादी अनुराग ठाकुर यांनी आमच्याशी संपर्क केलेला नाही किंवा चर्चा झाली नसल्याचं बजरंग पुनिया म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.