निशा राठोड (उदयपूर), 30 एप्रिल : राजस्थानचा काही भाग जंगलाने व्यापला असल्याने या भागात वाघ, हत्ती, सिंह यासारखे मोठे जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात. दरम्यान राजस्थानच्या जंगल भागात काही ठिकाणी लोकवस्तीसुद्धा आहे. यामुळे या जंगली प्राण्यांचा शहरालगतच्या वस्तीमध्ये संपर्क वाढला आहे. दरम्यान राजस्थानच्या उदयपूर येथील बेडवास परिसरात बिबट्या येत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.
मागच्या दोन दिवसांपूर्वी उदयपूर भागातील अलख नयन रुग्णालयाजवळील वसाहतीत बिबट्या फिरताना दिसला. यादरम्यान बिबट्याने कॉलनीतील एका घरात घुसून एका पाळीव कुत्र्याची शिकार केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
Shocking! गुळाची ढेप फोडताच मोठा ब्लास्ट, महिलेची भयंकर अवस्था; सत्य समजताच सर्वच हादरले
रात्रीच्या अंधारात बिबट्या कॉलनीत बेधडकपणे फिरत असून संधी मिळताच त्याने घरात उडी घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सकाळी उठल्यानंतर ही घटना लोकांच्या लक्षात येताच त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
शहरातील लोकवस्तीच्या भागात बिबट्याच्या हालचाली सातत्याने दिसून येत आहेत. मागच्या काही दिवसांपासून बिबट्या सतत येत असल्याने तो पाळीव प्राण्यावर लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. उदयपूर शहरातील बडगाव परिसरातही अनेक पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे.
Alert! मे महिन्यात सर्वात मोठं संकट, हजारो लोकांचा बळी जाणार; खळबळजनक दावा
9 एप्रिल रोजी उदयपूर शहरातील पालडी गावात एक शेतकरी आपल्या शेतात काम करत होता. त्यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला आपला शिकार बनवले. यानंतर वनविभागाने पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.