नवी दिल्ली, 20 एप्रिल : सोशल मीडियावर अनेक निरनिराळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. खास करुन प्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची विशेष पसंती असते. वन्य प्राणी आणि त्यांचं जीवन यांच्याविषयी अनेकांना कायमच आकर्षण असतं. त्यांचं राहणीमान, खाणं-पिणं वागणं या सर्वांविषयीच एक कुतुहल असतं. त्यामुळे असे व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होतात. अशातच सध्या वानरांचा एक श्रद्धांजली वाहतानाचा व्हिडीओ समोर आलाय. जो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे.
सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, खोट्या माकडाच्या पिल्ल्लांसाठी वानर दुःख व्यक्त करत आहेत. वानराने पहिल्यांदा त्या माकडाच्या खोट्या बाळाला खरं समजून त्याला मिठी मारली. तिथे खूप वानर सेना त्या पिलाला श्रद्धांजली वाहण्यासाठी दुःख व्यक्त करण्यासाठी जमा झालीये. यातून त्यांच्या भावना आणि इतरांशी व्यवहार करण्याची पद्धत दिसून येतेय. खरं तर हा व्हिडीओ एका डॉक्यमेंट्रीमधील छोटासा शॉट आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
This is how Langur Monkeys show empathetic behavior as they mourn what they think is a dead baby Langur, which is actually a robotic spy monkey. They hug and console each other. pic.twitter.com/G03E9wD6f8
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) April 17, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.