प्रयागराज, 15 एप्रिल : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी प्रयागराजमध्ये वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन्ही आरोपी भावांना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी येथे आणले असता स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयाजवळ ही घटना घडली. दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये दोघेही भाऊ हॉस्पिटलमध्ये जाताना माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिसत आहेत. अचाक अतिक अहमद याच्या डोक्याला कुणीतरी पिस्तूल लावून गोळी झाडली. अशरफला ही गोष्टी कळेपर्यंत त्याच्यावरही जोरदार फायरींग झाली. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, प्रयागराजचे मुख्य न्यायदंडाधिकारी दिनेश गौतम यांच्या न्यायालयाने गुरुवारी अतिक आणि अशरफ यांना उमेश पाल खून प्रकरणात 13 एप्रिल ते 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
Video : मीडियाशी बोलत असतानाच डोक्याला बंदूक लागली अन्.. गँगस्टर अहमद भावांची हत्या#atiqahmed #uttarpradesh pic.twitter.com/FjR0kOpN5r
— News18Lokmat (@News18lokmat) April 15, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.