मुंबई, 24 एप्रिल : संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण करणारी तसेच नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री समांथा रूथ प्रभू. वेगवेगळ्या भाषांमध्ये समांथानं आजवर काम केलं आहे. तिच्या अभिनयाचं सगळेच कौतुक करतात त्याचप्रमाणे तिच्या सौंदर्यावर देखील अनेक जण फिदा आहेत. आज लाखोंच्या मनावर राज्य करणारी समांथा शाळेत देखील हुशार विद्यार्थिनी होती. त्याचप्रमाणे कॉलेजमध्ये देखील ती उत्तम गुणांनी पास झाली आहे. समांथाचं 10वीचं ग्रेड कार्ड समोर आलं आहे. सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल देखील झालं आहे.
सोशल मीडियावर एक ग्रेड शीट व्हायरल होत आहे ज्यात समांथा असं नाव लिहिलं आहे. यात दहावीत समांथाला 1000 पैकी 887 गुण मिळाले होते. समांथाला गणितात 100 पैकी 100 तर फिजिक्समध्ये मात्र 50 पैकी 95 गुण मिळाले होते. इंग्रजीत 90 तर विज्ञानात 85, इतिहास 91 आणि भूगोलात 83 गुण मिळाले होते. तर मातृभाषेत म्हणजेच तमिळमध्ये समांथाला 88 गुण मिळाले होते. या मार्क शीटमध्ये फिजिक्समधले गुण बघून 50 पैकी 95 गुण कसे मिळाले यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
हेही वाचा – महाभारतात श्रीकृष्णाची भूमिका साकारायला नितीश भारद्वाज यांनी दिलेला नकार; काय होता तो किस्सा ?
समांथाचं नाव असलेली हे ग्रेड कार्ट 2020मध्ये देखील व्हायरल झालं होतं. यावेळी समांथानं हे व्हायरल ग्रेड कार्ट रिशेअर केलंय. त्यावर तिनं, ‘अरे हे पुन्हा व्हायरल झालं’ असं म्हणजे लाफिंग इमोजी शेअर केलेत.
रागालहरी नावाच्या एका ट्विटर हँडलवरून हे ग्रेड कार्ट शेअर करण्यात आलं आहे. ज्यावर कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, ‘एक टॉपर प्रत्येक ठिकाणी टॉपर असतो. मग ते स्टुडेंट असो, मुलगी असो, अभिनेत्री किंवा एक्टिव्हिस्ट, पत्नी असो किंवा सून. समांथानं लाखोंचं मनं जिंकलं आहे’.
अभिनेत्री समांथा नुकतीच शाकुंतलम या पौराणिक सिनेमात दिसली. समांथाने मेनका आणि विश्वामित्रांची मुलगी शांकुतलची प्रमुख भूमिका साकारली होती. 14 एप्रिलला सिनेमा रिलीज झाला मात्र बॉक्स सिनेमानं फारशी कमाल केली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.